अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्याची चाहत्यांची मागणी, #BharatRatnaForBACHCHAN ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 08:46 PM2018-04-19T20:46:27+5:302018-04-19T20:46:27+5:30

 बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भारतरत्न सन्मान द्यावा, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

Fans demand Bharat Ratna for Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्याची चाहत्यांची मागणी, #BharatRatnaForBACHCHAN ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये

अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्याची चाहत्यांची मागणी, #BharatRatnaForBACHCHAN ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये

Next

मुंबई -  बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भारतरत्न सन्मान द्यावा, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. अमिताभ बच्चन यांना भारत रत्न देण्याची मागणी करणारा  #BharatRatnaForBACHCHAN हा हॅशटॅग सध्या ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये आहे. या हॅशटॅगचा वापर करून चाहते विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 
 
 बिग बी, शहेनशाह, अॅँग्री यंग मॅन अशा विविध नावांनी बॉलिवडूमध्ये नाव कमावलं. स्ट्रगल करून स्वत:च्या हिंमतीवर एवढी मजल मारणारे अमिताभ बच्चन सगळ्याच नवकलाकारांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहेत. गेल्या ३ दशकात त्यांनी रसिक प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने खिळवून ठेवलंय. १८० हून अधिक चित्रपटात त्यांनी काम केलं असून काही चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायक आणि निर्मितीचेही काम केले आहे. ऐन तारुण्यात कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजंटची नोकरी सोडून देऊन अभिनयात कारकीर्द करण्यासाठी मुंबईत आलेल्या बिग बींनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच आपले चाहते बनवले आहे. 

 

Web Title: Fans demand Bharat Ratna for Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.