बनावट नोटा प्रकरण; तिघांना शिक्षा, दोघांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 03:26 AM2017-10-11T03:26:26+5:302017-10-11T03:27:08+5:30

बनावट नोटा बाळगणे, वापरणे या गुन्ह्यासाठी सत्र न्यायालयाने तीन आरोपींना सहा व तीन वर्षांची शिक्षा ठोठावली, तर दोन आरोपींची पुराव्यांअभावी सुटका केली़

 Fake currency case; Three sentenced, sentenced and released by both | बनावट नोटा प्रकरण; तिघांना शिक्षा, दोघांची सुटका

बनावट नोटा प्रकरण; तिघांना शिक्षा, दोघांची सुटका

Next

मुंबई : बनावट नोटा बाळगणे, वापरणे या गुन्ह्यासाठी सत्र न्यायालयाने तीन आरोपींना सहा व तीन वर्षांची शिक्षा ठोठावली, तर दोन आरोपींची पुराव्यांअभावी सुटका केली़
मुकेश सिंग, जसपाल सिंग, दयाल मंडल अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. दिनेश सिंग व हबिबूर शेख या दोघांची पुराव्यांअभावी न्यायालयाने सुटका केली़
२०१४मध्ये ही घटना घडली़ आरोपी बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी मुकेश व जसपालला अटक केली़ त्यानंतर दयाल मंडल व दिनेश सिंगला अटक झाली़ हबिबूर शेखला बिहारमधून अटक करण्यात आली़
सत्र न्यायाधीश भोसले यांच्यासमोर याचा खटला चालला़ आरोपींचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षाने २३ साक्षीदार तपासले़ शेखकडून अ‍ॅड़ प्रकाश साळशिंगिकर यांनी युक्तिवाद केला़ शेखला अटक केली तेव्हा हजर असलेले पंच हे होमगार्डमध्ये कार्यरत होते़ शेखला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले आहे़ त्याने बनावट नोटा बाळगल्या नाहीत व त्याचा व्यवहारातही वापर केला नाही़ त्यामुळे शेखची निर्दोष सुटका करावी, अशी मागणी अ‍ॅड़ साळशिंगिकर यांनी केली़ ती मान्य करत न्यायालयाने शेखची सुटका केली़ दिनेश सिंग यांच्याविरोधातही सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत न्यायालयाने त्याचीही सुटका केली़

Web Title:  Fake currency case; Three sentenced, sentenced and released by both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.