एकरकमी परतफेडीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 05:05 AM2019-07-16T05:05:31+5:302019-07-16T05:05:34+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे.

Extension to farmers for lump sum repayment | एकरकमी परतफेडीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ

एकरकमी परतफेडीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्शाची रक्कम भरण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम रु. १.५० लाखाच्या वर आहे, अशा शेतकºयांना रुपये १.५० लाखावरील त्यांच्या हिश्शाची रक्कम भरल्यानंतर योजनेअंतर्गत रुपये १.५० लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्यात येते.

Web Title: Extension to farmers for lump sum repayment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.