पेंग्विन दर्शनासाठी रोज २५ हजार नागरिकांना प्रवेश

By admin | Published: March 27, 2017 06:50 AM2017-03-27T06:50:09+5:302017-03-27T06:50:09+5:30

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय

Every day 25 thousand citizens are allowed to visit Penguin | पेंग्विन दर्शनासाठी रोज २५ हजार नागरिकांना प्रवेश

पेंग्विन दर्शनासाठी रोज २५ हजार नागरिकांना प्रवेश

Next

मुंबई :भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे. शनिवारी ४० हजारांहून जास्त पर्यटकांनी पेंग्विन पाहिले असून, रविवारही हाऊसफुल्ल गेला.
गर्दीचे नियोजन करता यावे म्हणून पेंग्विन दर्शनासाठी आता तीन वाजेपर्यंतच प्रवेश मिळणार आहे. असा निर्णयच पालिकेने घेतला आहे, असे उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी संचालक डॉ. संजय
त्रिपाठी यांनी सांगितले. नागरिकांची गर्दी लक्षात घेता या उद्यानात दररोज २५ हजार नागरिकांना प्रवेश देण्यात येईल आणि तिकीट विक्री ही ३ वाजेपर्यंत खुली राहील, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Every day 25 thousand citizens are allowed to visit Penguin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.