जूनमध्येही खिशाला ताण नाही; महागड्या कर्जापासून सुटका मात्र वर्षभरानंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 11:43 AM2023-04-24T11:43:40+5:302023-04-24T11:44:13+5:30

महागड्या कर्जापासून सुटका मात्र वर्षभरानंतरच, आरबीआयचे बुलेटिन

Even in June there is no strain on the pocket; Expensive debt relief but after a year | जूनमध्येही खिशाला ताण नाही; महागड्या कर्जापासून सुटका मात्र वर्षभरानंतर

जूनमध्येही खिशाला ताण नाही; महागड्या कर्जापासून सुटका मात्र वर्षभरानंतर

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने व्याजदर वाढविण्यास सुरुवात केली. सध्या त्यास ब्रेक लावला असला तरी दरवाढीची टांगती तलवार कायम आहे. मात्र, कदाचित कर्ज घेणाऱ्यांना हा दिलासा कायम राहू शकताे. वर्षभरात केलेली व्याजदर वाढ महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पुरेशी असल्याचे मत आरबीआयच्या पतधाेरण समितीच्या सदस्यांनी मांडले आहे. आरबीआयने सादर केलेल्या बुलेटिनमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

आरबीआयच्या पतधाेरण समितीची पुढील बैठक ६ जून राेजी हाेणार आहे. त्यातही व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय हाेण्याची शक्यता वाढली आहे. घाउक महागाई दाेन टक्क्यांच्या खाली आली आहे. तसेच किरकाेळ महागाईदेखील ६ टक्क्यांच्या खाली आली आहे. त्यामुळे व्याजदर वाढीची शक्यता कमीच आहे. तसेच संकेतही बुलेटिनमधून मिळत आहेत. 

पतधाेरण ठरले प्रभावी
n आरबीआयच्या बुलेटिनमध्ये पतधाेरण समितीने केलेल्या उपाययाेजनांचे काैतुक करण्यात आले आहे. 
n उपाययाेजनांचा परिणाम दिसू लागला आहे. महागाई आटाेक्यात येत आहे. 
n मात्र, हा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी हाेत नाही, ताेपर्यंत कठाेर धाेरण कायम राहील, असे स्पष्ट केले आहे.

‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा 
अंदाज चुकीचा’
n भारताचा जीडीपी विकास दराचा अंदाज वर्तविताना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून चूक झाली असू शकते, असे बुलेटिनमध्ये म्हटले आहे. 
n नाणेनिधीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात विकास दर ६.१ टक्क्यांवरून ५.९ टक्क्यांवर आणला, तर आरबीआयने ६.५ टक्के विकास दर राहू शकताे, असे म्हटले आहे. 
n रब्बी पीक हंगाम चांगला राहण्याची अपेक्षा आहे. पायाभूत सुविधांवर विशेष जाेर असल्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत मिळत असल्याचे आरबीआयचे डिप्टी गव्हर्नर मायकल देबब्रत पात्र यांनी म्हटले आहे.

व्याजदर वाढल्यामुळे 
घर खरेदी लांबणीवर
n गृहकर्ज महागल्याने घर खरेदीवर परिणाम हाेत असल्याचे दिसत आहे. सुमारे ९५% लाेकांनी घर खरेदी करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. ‘ॲनाराॅक’च्या सर्वेक्षणातून ही माहिती दिली आहे. 
n परिणामी, घरभाडेही वाढले आहे. येणाऱ्या काळात बॅंकेने व्याजदर कमी केल्यास घर खरेदी करणाऱ्यांना माेठा दिलासा मिळेल.

कर्जे बुडू शकतात, आरबीआयने केले सावध

व्याजदर वाढ आणि महागाईमुळे 
पर्सनल लाेन तसेच क्रेडिट कार्डच्या थकबाकीबाबत आरबीआयने बॅंकांना सावध केले आहे. येणाऱ्या काळात या कर्जांची थकबाकी आणि एनपीए वाढू शकताे, असा आरबीआयचा अंदाज आहे.

क्रेडिट कार्डवरून दिलेली उधारी ३४ हजार काेटी रुपयांनी वाढली आहे. आरबीआयने व्याजदर वाढीला सध्या स्थगिती दिली तरीही दर वाढलेले आहेत. त्यामुळे धाेका कायम आहे. बॅंकांनी आक्रमक पद्धतीने कर्ज वाटप केल्यास डिफॅल्टचे प्रमाण वाढू शकताे, असे आरबीआयने म्हटले आहे.

महागाई नियंत्रणात राहिल्यास मार्च २०२४ पर्यंत व्याजदरात घट हाेण्याची अपेक्षा आहे.

कर्जांचे प्रमाण वाढले

क्षेत्र    कर्जवाटप     वाढ
गृह    १९.१०    १५%
क्रेडिट कार्ड    १.८७    २९.२%
वाहन    ४.९६    २३.४%
इतर कर्ज    १०.७८    २५.८%
    (कर्जवाटप लाख काेटी रुपयांत)

 

Web Title: Even in June there is no strain on the pocket; Expensive debt relief but after a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.