डेडलाइन संपल्यानंतरही मुंबई खड्ड्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:43 AM2018-07-17T01:43:40+5:302018-07-17T01:43:49+5:30

मुंबईत गेले दोन दिवस सलग पावसाची हजेरी असल्याने मुंबई खड्डेमुक्त करण्याची मोहीमही लांबणीवर पडली आहे. त्यात मुसळधार पावसाने महापालिकेच्या अडचणीत भर घातली आहे.

Even after the deadline is over in the Mumbai pit | डेडलाइन संपल्यानंतरही मुंबई खड्ड्यातच

डेडलाइन संपल्यानंतरही मुंबई खड्ड्यातच

Next

मुंबई : मुंबईत गेले दोन दिवस सलग पावसाची हजेरी असल्याने मुंबई खड्डेमुक्त करण्याची मोहीमही लांबणीवर पडली आहे. त्यात मुसळधार पावसाने महापालिकेच्या अडचणीत भर घातली आहे. जुन्या एका तक्रारीनुसार खड्डे भरताना आणखी दहा नवीन खड्ड्यांचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे खड्डे भरण्याचे काम अद्यापही अनेक भागांमध्ये सुरूच आहे.
मुंबईच्या खड्ड्यांवरून न्यायपालिका, राजकीय नेते आणि मुंबईकरांकडूनही मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठत आहे. त्यामुळे ४८ तासांमध्ये मुंबईतील सर्व खड्डे बुजविण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने महासभेत दिले होते. मात्र हे आश्वासन म्हणजे मुंबईकरांच्या डोळ्यांत निव्वळ धूळफेक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अजून तापले असून, खड्ड्यांमुळे एकाचाही जीव गेल्यास महापालिकेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.
दरम्यान, रविवारी खड्डे बुजविण्याची मुदत संपल्यानंतरही महापालिकेची धावपळ संपलेली नाही. मुंबईत केवळ ३५८ खड्डे असल्याचा प्रशासनाचा दावा पावसाने उधळून लावला आहे. सलग कोसळणाºया पावसामुळे मुंबईत आणखी नवीन खड्ड्यांची भर पडू लागली आहे. याबाबत अधिकाºयांच्या बैठका, प्रशासनाकडून झाडाझडती, राजकीय दबाव यामुळे वातावरण तापले आहे.
त्यामुळे रस्ते विभागातील अधिकाºयांची मात्र पुरती कोंडी
झाली आहे. याबाबत विचारले असता, खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याचे रस्ते विभागातील अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Even after the deadline is over in the Mumbai pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.