‘घोडचूक’ केलेल्या विद्यार्थिनीस मिळू शकणार मेडिकलला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 05:21 AM2018-07-23T05:21:43+5:302018-07-23T05:22:03+5:30

हायकोर्टाने दिला न्याय; पसंती पर्याय भरताना झाली होती चूक, अर्जदार महाराष्ट्रातील निवासी नाही

Entrance to Medical Entrance Students | ‘घोडचूक’ केलेल्या विद्यार्थिनीस मिळू शकणार मेडिकलला प्रवेश

‘घोडचूक’ केलेल्या विद्यार्थिनीस मिळू शकणार मेडिकलला प्रवेश

Next

मुंबई : राज्याच्या सध्या सुरु असलेल्या ‘एमबीबीबीएस’ प्रवेश प्रक्रियेत पसंतीच्या वैद्यकीय महाविद्यालयांचा पर्याय देण्याऐवजी नर्सिंग कॉलेजांचे पर्याय देण्याची घोडचूक अनवधानाने केलेल्या शशि सारक्वत या विद्याथिर्नीस मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे वैद्यकीय प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
शशी महाष्ट्रातील निवासी नाही. तिचे वडील खडकी येथील लष्करी इस्पितळात हवालदार होते व ते यंदा १ जुलै रोजी निवृत्त झाले. प्रवेश नियमांनुसार राज्यातील प्रत्येक सरकारी, महापालिकेच्या व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयात परराज्यातील परंतु महाराष्ट्रात बदली होऊन आलेल्या संरक्षण दलांतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे. या आरक्षणास ‘डिफेन्स-३’ आरक्षण म्हटले जाते व राज्यात अशा एकूण १२ जागा राखीव आहेत.
दि. ४ जून रोजी ‘नीट’ परीक्षेचा निकालजाहीर झाल्यावर राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची अधिसूचना ६ जून रोजी जाहीर झाली. त्यावेळी शशीचे वडील लष्करी सेवेत होते म्हणून तिने ‘डिफेन्स-३’ कोट्यातून अर्ज भरला. शशीच्या कागदपत्रांची पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजात पडताळणी झाली व त्यात ती पात्र ठरली.
प्रवेश प्रक्रियेतील या पुढच्या टप्प्याला उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या १२ कॉलेजांचा पसंतीक्रम अÞनलाइन द्यायचा होता. शशीने लखनऊ येथील एका सायबर कॅफेत बसून हा पसंतीक्रम देताना मोठी घोडचूक केली. कॉलेजांना दिलेले कोडनंबर नीट ध्यानात न घेतल्याने तिच्याकडून पसंतीच्या १२ मेडिकल कॉलेजांऐवजी १२ नर्सिंग कॉलेजचा पसंतीक्रम दिला गेला. त्यामुळे ‘आॅन लाइन अ‍ॅडमिशन’च्या पहिल्या फेरीच्या वेळी तिच्या नावापुढे ‘पसंतीक्रम दिलेला नाही’ असा शेरा आला व ती प्रवेशप्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर फेकली गेली. संबंधित अधिकाºयांकडे अर्ज विनंत्या केल्या, पण या संगणकीय प्रक्रियेत आपण काहीच करू शकत नाही, असे सांगून त्यांनी हतबलता व्यक्त केली. या टपप्याला शशीने उच्च न्यायालयात रिट याचिका केली. राज्यातील ‘डिफेन्स-३’ कोट्यासाठी एकूण ७३ उमेदवारांनी अर्ज केले होते.
मात्र न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून असे नमूद केले की, एका माजी सैनिकाच्या मुलीस, अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल मेडिकल प्रवेशाच्या संधीपासून कायमचे वंचित करणे न्यायाचे होणार नाही.

प्राधिकरणाचा होता विरोध
प्रवेश प्राधिकरणाच्या वकिलाने स्वत:च केलेल्या चुकीचा शशीला फायदा घेऊ देण्यास व प्रक्रियेच्या या टप्प्यात तिला सामिल करण्यास विरोध केला. तसे केले तर शिल्लक राहिलेल्या दोन जागांसाठी स्पर्धेत असलेल्या ६३ अन्य उमेदवारांवर अन्याय होईल, असे त्यांचे म्हणणे होते.

Web Title: Entrance to Medical Entrance Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.