Electric 'shock' after fuel; Electricity charges hike in maharashtra | इंधनापाठोपाठ विजेचा 'झटका'; महागाईने हैराण झालेल्या राज्यवासीयांवर महावितरणचा भार
इंधनापाठोपाठ विजेचा 'झटका'; महागाईने हैराण झालेल्या राज्यवासीयांवर महावितरणचा भार

मुंबईः पेट्रोल, डिझेल दरवाढीचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्रवासीयांना आता राज्य वीज नियामक आयोगाने 'झटका' दिला आहे. महावितरणची वीज महाग झाल्यानं राज्यवासीयांच्या खिशावर भार पडणार आहे. 

शेतीसाठी दिल्या जाणाऱ्या विजेचा दर सध्या ३.३५ रुपये प्रती युनिट होता. तो आता ३.५५ रुपये करण्यात आला आहे. घरगुती वापरासाठीच्या विजेचे दरही वाढवण्यात आल्याची माहिती एमईआरसीचे प्रमुख आनंद कुलकर्णी यांनी दिली.  

घरगुती वापरसाठीच्या विजेचा दर १०० युनिटपर्यंत ५.०७ रुपये प्रती युनिट आणि १०१ ते ३०० युनिटपर्यंतचा दर ८.७४ रुपये प्रती युनिट होता. तो आता अनुक्रमे ५.३१ रुपये प्रती युनिट आणि ८.९५ रुपये प्रति युनिट होणार आहे.


Web Title: Electric 'shock' after fuel; Electricity charges hike in maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.