२०१९ च्या निवडणूक प्रचारात बीकेसी मैदान नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 05:20 AM2018-04-24T05:20:43+5:302018-04-24T05:20:43+5:30

एमएमआरडीएने पुढच्या ६ वर्षांसाठी राजकीय सभा, बॉलीवूड इव्हेंट किंवा कोणत्याही भव्य कार्यक्रमासाठी बीकेसीमधील मैदान भाड्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे.

In the election campaign of 2019, BKC ground no reichable | २०१९ च्या निवडणूक प्रचारात बीकेसी मैदान नॉट रिचेबल

२०१९ च्या निवडणूक प्रचारात बीकेसी मैदान नॉट रिचेबल

googlenewsNext

अजय परचुरे ।
मुंबई : आवाज कोणाचा... अशा राजकीय कार्यकर्त्यांच्या आरोळ्या आता पुढची ६ वर्षे तरी मुंबईतील बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर ऐकू येणार नाहीेत. मोठमोठ्या गर्दीचा उच्चांक गाठणाऱ्या राजकीय सभा आता बीकेसी मैदानावर होणार नाहीत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, मैदानातील एक तृतीयांश भागात बुलेट ट्रेनच्या मार्गाचे काम सुरू राहणार आहे. म्हणून एमएमआरडीएने पुढच्या ६ वर्षांसाठी राजकीय सभा, बॉलीवूड इव्हेंट किंवा कोणत्याही भव्य कार्यक्रमासाठी बीकेसीमधील मैदान भाड्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासूनच या आदेशाची अंमलबजावणी झाली असून, आत्तापर्यंत तब्बल ३६ कार्यक्रमांना एमएमआरडीएकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. याचा मोठा फटका राजकीय पक्ष आणि भव्यदिव्य इव्हेंट करणाºया आयोजकांना बसणार आहे.
राजकीय पक्षांना आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आता मुंबईतील इतर मैदानांचा आधार घ्यावा लागणार आहे, पण बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानामध्ये पुढच्या वर्षी होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय सभा मात्र होणार नाहीत.
बीकेसीमधील एमएमआरडीए मैदान हे अनेक ऐतिहासिक सभांसाठी आणि झालेल्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लोकपाल विधेयकासाठी पहिले आंदोलनही याच मैदानावर झाले होते.
२०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्या सभाही या मैदानाने पाहिल्या आहेत. नुकताच अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाचा महामेळावाही याच मैदानात झाला होता. हाच महामेळावा या मैदानावरचा शेवटचा राजकीय कार्यक्रम ठरला आहे. राजकीय कार्यक्रम सोडून सिनेमांचे पुरस्कार सोहळे, कॉर्पोरेट इव्हेंट, रिअ‍ॅलिटी शोचे ग्रँड फिनालेही या मैदानावर पार पडतात, पण आता या सगळ्या कार्यक्रमांना पर्यायी जागा शोधावी लागणार आहे.
बीकेसीत एमएमआरडीएच्या मालकीचे ५० एकरचे हे मैदान आहे. यातील ३० एकर जागा ही एमएमआरडीएकडून राजकीय सभा आणि अन्य इव्हेंटसाठी भाड्याने देण्यात येते. यातील उरलेली २०
एकर जागा आता बुलेट ट्रेनच्या कामासाठी देण्यात आली
आहे. लवकरच याचे काम सुरू होणार आहे.

कुठे होणार राजकीय सभा?
पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांना आता बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानाशिवाय पर्याय शोधावे लागणार आहे. गोरेगांवमधील एनएसई मैदान, दादरचे शिवाजी पार्क असे काही पर्याय राजकीय पक्षांना आपल्या सभा घेण्यासाठी उपलब्ध आहेत.

Web Title: In the election campaign of 2019, BKC ground no reichable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.