बोरीवली स्थानकात वृद्ध जोडप्याला जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 10:00 AM2024-02-10T10:00:22+5:302024-02-10T10:01:28+5:30

बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर एक वृद्ध जोडपे दादर एकतानगर सेमीफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते.

elderly couple saved at borivali station vigilance of rpf jawan in mumbai | बोरीवली स्थानकात वृद्ध जोडप्याला जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता 

बोरीवली स्थानकात वृद्ध जोडप्याला जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता 

मुंबई :  बोरीवली स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर एक वृद्ध जोडपे दादर एकतानगर सेमीफास्ट एक्स्प्रेसने प्रवास करत होते. गुरुवारी मध्यरात्री १२:२६च्या सुमारास एसी डब्यात चढत असताना पाय घसरून ते गाडी आणि फलाटाच्यामध्ये आले; आरपीएफचे सहायक पोलिस उपनिरीक्षक आशिष बिर्ले  यांच्या प्रसंगावधानामुळे  त्यांचे प्राण वाचले. 

एकतानगर सेमीफास्ट एक्स्प्रेस बोरीवली स्थानकात फलाट क्रमांक ६ वर गुरुवारी मध्यरात्री १२:२१ वाजता आली.  एका वृद्ध जोडप्याने ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये आरक्षण केले होते; परंतु ट्रेन सुटल्यानंतर एसी कोचमध्ये बुक करण्यात आले होते. डब्यात सामान ठेवण्याचा प्रयत्न करत असताना चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक वयोवृद्ध पुरुष प्रवासी आणि एक वयोवृद्ध महिला प्रवासी कोच आणि प्लॅटफॉर्ममध्ये घसरले. ते पाहून ट्रेन एस्कॉर्ट टीमचे प्रभारी सहायक पोलिस उपनिरीक्षक आशिष बिर्ले हे चालत्या ट्रेनमधून खाली उतरले. उतरल्यानंतर त्या वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढले. तिला पाहताच सहप्रवासी एक वृद्ध पुरुषही घसरला.  त्यांनाही वाचविण्यात आले.  

या वृद्ध जोडप्याच्या दोन पिशव्या कारमध्येच होत्या. याची माहिती बोरीवली  ठाण्यात देण्यात आली.  वृद्ध जोडप्याला डेहराडून एक्स्प्रेसमध्ये चढविल्यानंतर हे रहिवासी कासमवाला मस्जिद बडोदा गुजरातजवळील नगरवाडा येथील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांचे सामान सुरक्षित स्थितीत त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

बोरिवली स्थानकात एक वृद्ध जोडपे पाय घसरून गाडी आणि फलाटाच्यामध्ये आले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. 

Web Title: elderly couple saved at borivali station vigilance of rpf jawan in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.