‘पॉझिटिव्ह’ जनजागृतीमुळे एचआयव्हीचे प्रमाण घटले, सहा वर्षांतील आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:37 AM2017-12-01T07:37:12+5:302017-12-01T07:38:39+5:30

एड्ससारख्या प्राणघातक रोगाला इलाज नसतो, एकदा तो झाला की मृत्यू ठरलेलाच... अशा सुरुवातीच्या गैरसमजांमुळे समाजात भीती निर्माण झाली होती. मात्र मागील काही वर्षांत सामाजिक आणि शासकीय यंत्रणांच्या पातळीवर एचआयव्हीसंदर्भात मुंबईत

 Due to 'positive public awareness', the number of HIV cases decreased, six years' statistics | ‘पॉझिटिव्ह’ जनजागृतीमुळे एचआयव्हीचे प्रमाण घटले, सहा वर्षांतील आकडेवारी

‘पॉझिटिव्ह’ जनजागृतीमुळे एचआयव्हीचे प्रमाण घटले, सहा वर्षांतील आकडेवारी

Next

- स्नेहा मोरे
मुंबई : एड्ससारख्या प्राणघातक रोगाला इलाज नसतो, एकदा तो झाला की मृत्यू ठरलेलाच... अशा सुरुवातीच्या गैरसमजांमुळे समाजात भीती निर्माण झाली होती. मात्र मागील काही वर्षांत सामाजिक आणि शासकीय यंत्रणांच्या पातळीवर एचआयव्हीसंदर्भात मुंबईत पॉझिटिव्ह अर्थात सकारात्मक जनजागृती केल्यामुळे एचआयव्हीची लागण झालेल्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या सहा वर्षांत मुंबई शहर-उपनगरातील एड्सचे रुग्ण १४ हजारांवरून ६,७७२ वर येऊन ठेपले आहे. २०१०-११ साली मुंबईत एड्स रुग्ण १४ हजार २९१ होते, तर २०१६-१७ साली ६ हजार ७७२ आहेत. मुंबईतील एड्स रुग्णांचे प्रमाण ५६ टक्क्यांनी घटले आहे, अशी माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने दिली आहे.
सरकारी आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे मुंबई शहरातील एड्सचे प्रमाण कमी झाले आहे. जनजागृतीमुळे तपासणी करून घेण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. २०१०-११मध्ये गर्भवती महिलांमधील एड्सचे ४६६ रुग्ण होते, तर २०१६-१७ मध्ये हे रुग्ण केवळ १६२ एवढे कमी झाले. या एड्सच्या रुग्णांमध्ये ६५ टक्क्यांनी घट झाली आहे. एड्सबाधित असणाºया ७९ टक्के रुग्णांचा वयोगट हा १५ ते ४९ हा आहे, तर त्यातील ३६ टक्के या महिला व तरुणी आहेत. एड्सबाधित रुग्णांपैकी ९३ टक्के रुग्णांना असुरक्षित शारीरिक संबंधामुळे एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३.७ टक्के चिमुरडे त्यांच्या आईमुळे एड्सचे शिकार ठरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याशिवाय रक्तातून एड्सची बाधा होण्याचे प्रमाण ०.३ टक्के एवढे आहे आणि सुई किंवा अन्य साहित्यांद्वारे एड्सची लागण होण्याचे प्रमाण ०.५ टक्के आहे.
एड्स जनजागृतीसाठी शून्य संसर्ग, गैरसमज टाळण्यावर भर दिला जात आहे. रुग्णांनी कसा आहार घ्यावा, प्रोटिन्स कसे घ्यावेत आदींचे मार्गदर्शन आहारतज्ज्ञांच्या माध्यमातून रुग्णांना करण्यात येत आहे. एचआयव्हीचा धोका जास्त असणाºया सर्व व्यक्तींची तपासणी, बाधित व्यक्तींचे सातत्याने आणि विनाशुल्क उपचार, त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची तपासणी, वारंवार समुपदेशन अशी जनजागृतीची अनेक कामे सुरू आहेत.

एड्सच्या रुग्णांना आता ‘आहारा’चा दिलासा
च्बºयाचदा एचआयव्हीची तपासणी करण्यासाठी येणारे रुग्ण हे रस्त्यावर राहणारे किंवा स्थलांतरितही असतात. अशा वेळी ज्या रुग्णांना तपासण्यांनंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले त्यांच्या पोषणाची जबाबदारी मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटीने घेतली आहे. महिला व बालकल्याण विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या साहाय्याने एड्स नियंत्रण सोसायटी एचआयव्ही रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहे.
च्त्याचाच भाग म्हणून केवळ एचआयव्ही बाधित रुग्णांना उपचारांसाठी मदत न करता औषधोपचांरासह योग्य आहार मिळणेही गरजेचे आहे. त्याकरिता आता एचआयव्ही बाधित रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपाची शिधापत्रिकाही मिळणार आहे. जेणेकरून यामुळे या रुग्णांना अन्नधान्याचा पुरवठा मिळून योग्य आहाराची गरज पूर्ण होईल.

बाधित रुग्णांवर लक्ष
रुग्ण केंद्रांपर्यंत येण्याची वाट न पाहता रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्यसेवक सतत प्रयत्नशील आहेत. एकही बाधित रुग्ण नजरेतून सुटू नये असा प्रयत्न असतो. गेल्या सहा वर्षांची आकडेवारी पाहता जनजागृतीचा चांगला परिणाम होत असून त्यामुळेच शहर-उपनगरात एड्सचे रुग्ण घटल्याचे स्पष्ट होते.
- डॉ. श्रीकला आचार्य, अतिरिक्त प्रकल्प संचालक, मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था

च्संसर्गित गर्भवती मातेकडून बाळाला होणारे एचआयव्हीचे संक्रमण रोखण्यास मातांमध्ये एचआयव्ही संक्रमणाचे निदान लवकर करणे व उपचार देणे हा एचआयव्ही नियंत्रणाचा मुख्य भाग आहे. याकरिता, संसर्गित मातेला गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यापासून बहुऔषधी एचआयव्हीनाशक उपचार पद्धती चालू केली जाते. त्याचप्रमाणे, एचआयव्ही संसर्गित मातेच्या नवजात बालकाची एचआयव्ही संसर्गाची तपासणी जन्मानंतर लगेचच आणि वयाच्या १८ महिन्यांपर्यंत नियमितपणे केली जाते. त्यानुसार गेल्या सहा वर्षांत गर्भवती महिलांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाणे कमी झाले.
च्२०१०-११ साली १ लाख ७ हजार ५६२ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली होती, त्यातील ४६६ महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह होत्या. मात्र २०१६-१७ साली १ लाख २६ हजार ४३५ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली, त्यातील केवळ १६२ महिला एचआयव्हीग्रस्त असल्याचे निदान झाले आहे.

Web Title:  Due to 'positive public awareness', the number of HIV cases decreased, six years' statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई