आधीच्या आगीकडे दुर्लक्ष केल्यानेच कामगार रुग्णालयामध्ये गेले बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:32 AM2018-12-18T06:32:40+5:302018-12-18T06:33:13+5:30

भंगार पेटल्याचा संशय; नव्या इमारतीचा जीना बंद असल्याचे उघड, प्रशासनाचा हलगर्जीपणा

Due to ignorance of the previous fire, victims of the Kamgar Hospital have died | आधीच्या आगीकडे दुर्लक्ष केल्यानेच कामगार रुग्णालयामध्ये गेले बळी

आधीच्या आगीकडे दुर्लक्ष केल्यानेच कामगार रुग्णालयामध्ये गेले बळी

Next

मनोहर कुंभेजकर 

मुंबई : अंधेरीस्थित कामगार रुग्णालयात या आधी चार महिन्यांपूर्वी आगीची घटना घडली होती. रुग्णालय प्रशासनाने यातून बोध घेत, वेळीच अग्निप्रतिबंधक उपाययोजना केली असती, तर आजची मोठी दुर्घटना टळली असती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

१९७० साली अंधेरी पूर्वे येथे ३५० बेडचे रुग्णालय कामगारांसाठी बांधण्यात आले. २००८ पर्यंत ते राज्य सरकारच्या अखत्यारित होते. त्यानंतर ते केंद्राने ताब्यात घेतले. दहा वर्षांपासून येथे ५०० बेडच्या नव्या इमारतीचे काम सुरू आहे. तळमजल्यावरील गोदामात भंगार आहे. त्याला आग लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आगीचा धूर शेजारील जुन्या इमारतीत पसरला. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक अतिदक्षता, एक पुरुष, एक महिला आणि एक महिला शस्त्रक्रिया वॉर्ड असे मिळून एकूण चार वॉर्ड आहेत. अतिदक्षता विभागात ७ रुग्ण, महिला विभागात २० रुग्ण, तर पुरुष विभागात २५ रुग्ण होते. त्यातच नव्या इमारतीतून बाहेर पडणारा जीना बंद होता, तर जुन्या इमारतीतून आगीच्या धुरांचे लोट बाहेर पडत असल्याने रुग्णांना बाहेर पडणे अशक्य झाले.
जीव वाचविण्यासाठी काहींनी पहिल्या आणि चौथ्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. दरम्यान, खासदार गजानन कीर्तिकर यांनी या आगीची चौकशी व रुग्णालयाच्या फायर आॅडिटची मागणी केली आहे.

आगीचे कारण हॉस्पिटल नसून एनबीसीसी

च्सध्या येथील नव्या इमारतीचे काम हे गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. या बांधकामाची सर्व जबाबदारी ही दिल्लीच्या नॅशनल बोर्ड कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनची (एनबीसीसी) आहे. संबंधितांवर कोणाचे नियंत्रण मुंबईत नाही. कारभार मनमानी असून, गोदामात साहित्य टाकले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या आगीचे कारण येथील कामगार हॉस्पिटल नसून एनबीसीसी आहे, असा आरोपही केला जात आहे.

नव्या इमारतीचा जीना बंद
येथील नव्या इमारतीतून बाहेर पडणारा जिनाही बंद होता. जुन्या इमारतीतून आगीच्या धुरांचे लोट बाहेर पडत असल्याने रुग्णांना बाहेर पडणे अशक्य झाले. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी काहींनी पहिल्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या.

आगीची जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची
च्अंधेरीतील कामगार रुग्णालयामधील आगीची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासनाची आहे, असे म्हणणे डेप्युटी चीफ फायर आॅफिसर एन.व्ही. ओगले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. येथील आग प्रतिबंधक यंत्रणेत त्रुटी असल्याचे पंधरा दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते, असेही ते म्हणाले.
च्दरम्यान, दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाचे गेल्या सात ते आठ वर्षात फायर आॅडिट झाले नव्हते, अशी माहिती सुत्रांनी दिली.
 

Web Title: Due to ignorance of the previous fire, victims of the Kamgar Hospital have died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.