तीन वर्षांच्या मुलीने गिळलेले पाच रुपयांचे नाणे एन्डोस्कोपीद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 06:01 AM2019-01-18T06:01:33+5:302019-01-18T06:01:40+5:30

एन्डोस्कोपीसाठी गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव हिंगोरानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने उपचार केले.

Doctor success to take out a five-year-old coin with endoscopy | तीन वर्षांच्या मुलीने गिळलेले पाच रुपयांचे नाणे एन्डोस्कोपीद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

तीन वर्षांच्या मुलीने गिळलेले पाच रुपयांचे नाणे एन्डोस्कोपीद्वारे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश

Next

मुंबई : दहिसर येथील तीन वर्षांच्या चिमुरडीने घरात खेळताना पाच रुपयांचे नाणे गिळले. नाणे गिळल्यामुळे या चिमुरडीला श्वसनास त्रास उद्भवला, त्याचप्रमाणे बोलण्यास अडथळा निर्माण होत होता. परंतु, पालकांनी तत्काळ बोरीवली येतील खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. तेथील डॉक्टरांनी एन्डोस्कोपीच्या साहाय्याने हे नाणे बाहेर काढले. आता त्या चिमुरडीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


एन्डोस्कोपीसाठी गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव हिंगोरानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने उपचार केले. आपत्कालीन एन्डोस्कोपी प्रक्रिया करून ते पाच रुपयांचे नाणे यशस्वीरीत्या बाहेर काढले. अन्ननलिकेवाटे नाणे बाहेर काढताना ते श्वास नलिकेत पडू नये याची विशेष खबरदारी डॉक्टरांना घ्यावी लागली.


गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. राजीव हिंगोरानी यांनी सांगितले की, मुलीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अशा काही प्रकरणांत मुलांनी गिळलेल्या वस्तू आपोआप बाहेर येतील याची पालक वाट बघतात व त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

श्वसनाचा त्रास
पाच रुपयांचे नाणे गिळल्यामुळे चिमुरडीला श्वसनास त्रास उद्भवला होता, त्याचप्रमाणे बोलण्यास अडथळा निर्माण होत होता. हे नाणे डॉक्टरांनी आपत्कालीन एन्डोस्कोपी प्रक्रिया करून यशस्वीरीत्या बाहेर काढल्याने चिमुरडीचा जीव वाचला आहे.

Web Title: Doctor success to take out a five-year-old coin with endoscopy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.