‘गँगस्टर पुजारीविरोधात गुन्हा नोंदवू नका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 01:55 AM2015-08-18T01:55:39+5:302015-08-18T01:55:39+5:30

गँगस्टर रवी पुजारीने ५ कोटींची खंडणी मागितल्यानंतरही गुन्हा नोंंदवू नका़ माझ्यासोबत पुजारीचा जो संवाद झाला त्यात मला धमकी जाणवली नाही

'Do not register crime against gangster priest' | ‘गँगस्टर पुजारीविरोधात गुन्हा नोंदवू नका’

‘गँगस्टर पुजारीविरोधात गुन्हा नोंदवू नका’

Next

मुंबई : गँगस्टर रवी पुजारीने ५ कोटींची खंडणी मागितल्यानंतरही गुन्हा नोंंदवू नका़ माझ्यासोबत पुजारीचा जो संवाद झाला त्यात मला धमकी जाणवली नाही, अशी विनंती प्रसिद्ध पार्श्वगायक अरजित सिंग याने ओशिवरा पोलिसांना केली आहे. सोमवारी ओशिवरा पोलिसांनी अरजितचा सविस्तर जबाब नोंदवला. त्यात पुजारीने धमकाया नहीं, बल्की मेरे लिये गायेगा क्या, अशी विचारणा केल्याचे अरजितने सांगितले.
अरजितने नकार दिला असला तरी ओशिवरा पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी तपासाला लागले आहेत. पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवला आहे. या वृत्ताला वरिष्ठ निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी दुजोरा दिला.
३ आॅगस्टला अरजितच्या स्वीय साहाय्यकाला पुजारीने धमकीचा फोन केला. बहोत पैसे कमा रहा हैं. पाच करोड देने को बोलो, नहीं तो ठोक दुंगा, हे ऐकून साहाय्यक थरथरला. ४ आॅगस्टला पुन्हा पुजारीने फोन केला. तेव्हा साहाय्यकाने कॉन्फरन्सिंगद्वारे अरजितलाही सहभागी केले. यावेळी पुजारीने पुन्हा ५ कोटींची मागणी केल्याची माहिती मिळते. अरजितने मात्र इतके पैसे माझ्याकडे नसून तेवढी ऐपतही नसल्याचे पुजारीला सांगितले. त्यानंतर पुजारीने अरजितचे कौतुकही केल्याचे समजते. तुझा आवाज चांगला आहे. माझ्यासाठी गाशील का, असा सवाल केल्याचेही समजते. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रसंग अरजितने ओशिवरा पोलिसांनी नोंदविलेल्या जबाबात कथन केला.

Web Title: 'Do not register crime against gangster priest'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.