मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याबद्दल संकोच बाळगू नये  - श्रेयस तळपदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 08:42 PM2018-04-02T20:42:12+5:302018-04-02T21:55:48+5:30

‘पॅडवूमन’ डॉ. भारती लव्हेकर यांच्यातर्फे महापालिका शाळांमधील ४ हजार मुलींना मोफत सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी पॅड डिसपोजल पाऊचचे वाटप

Do not hesitate to think about menstrual cycle - Shreyas Talpade | मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याबद्दल संकोच बाळगू नये  - श्रेयस तळपदे

मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे, त्याबद्दल संकोच बाळगू नये  - श्रेयस तळपदे

Next

- मनोहर कुंभेजकर 

मुंबई - मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे त्याबद्दल संकोच बाळगू नये असे आवाहन आघाडीचा अभिनेता श्रेयस तळपदे यांनी आज वर्सोव्यात केले. देशातील पहिली डिजिटल सॅनिटरी बँक सुरु करणा-या व 'पॅडवूमन' नावाने ओळखल्या जाणा-या वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यातर्फे महापालिका शाळांमधील ४ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी पॅड डिसपोजल पाऊचचे वाटप वीरा देसाई रोड वरील चित्रकूट ग्राऊंड,वर्सोवा येथे करण्यात आले. यावेळी सॅनिटरी पॅड डिसपोजल पाऊचचेही लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत झाले,त्यावेळी त्याने उपस्थित मुंबई महानगर पालिकेच्या 52 शाळांमधील मार्गदर्शन केले.
जेव्हा श्रेयस तळपदे उपस्थितांशी संवाद साधण्यास उभा राहिला तेव्हा उपस्थितांनी त्याला टाळ्यांच्या कडकडाटा दाद दिली.  भाषणाच्या सुरवातीलाच श्रेयसने आवर्जून सांगितले की, तो त्याच्या बायकोला सॅनिटरी पॅड विकत आणून देतो.ज्या प्रभावीपणे आणि वेगाने देशातील आणि देशाबाहेरील वयोगट 12 ते 50 वयोगटातील गरजू मुली व महिलांना सॅनिटरी पॅड बँकेच्या माध्यमातून मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देतात हे खरोखरीच कौतुकस्पद आहे,त्यामुळे त्यांना त्यांना सुपर वूमनच म्हणायला हवं. येथे उपस्थित विद्यार्थिनीनी अशाप्रकारे समाजोपयोगी काम करून स्वतःचा ठसा उमटवणे खरंच गरजेचे आहे. आमदार डॉ.लव्हेकर यांची डिजिटल सॅनिटरी पॅड बँक खूप चांगले काम करत आहे ही बँक अशीच प्रगती करत राहो" अशा सदिच्छा श्रेयस तळपदेने व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे अध्यकस्थानी् आमदार  विनायकराव मेट होते तर, विशेष अतिथी म्हणून कामा हॉस्पिटल अधिष्ठाता डॉ.राजश्री कटके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अंकेष साहित्या, जनसेवा मंडळाच्या प्रशासिका वैशाली म्हात्रे, के- पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष  योगीराज दाभाडकर, वॉर्ड क्रमांक ६३ च्या भाजपा नगरसेविका् रंजना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.या मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

सुरवातीला महानगरपालिकेच्या विद्यार्थिनींनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य सादर करून उपस्थितांची जोरदार वाहवा मिळवली. महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांच्या बहारदार नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वेशभूषा करून नटलेली मुलं नृत्यावर थिरकताना उपस्थितांची वाहवा मिळवत होती.उपस्थितांची मने जिंकल्याने ही मुलं अधिक जोमाने नृत्य सादर करत होती.या कार्यक्रमाला ५२ महानगरपालिका शाळांमधील ४ हजार विद्यार्थिनी, शिक्षक, पालक तसेच वर्सोव्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 डॉ. भारती लव्हेकर यांनी उपस्थित मान्यवर, महानगरपालिका शाळा, शिक्षक आणि विद्यार्थिनींचे मनापासून आभार मानले  सगळ्याच महिला किंवा मुलींना सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नाही. त्या पर्यायी साधन म्हणजे कपडा आदींचा वापर करतात. अशा गरजू मुली आणि महिलांसाठी आम्ही मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देतो. आज आम्ही मुंबईतील ५२ महापालिका शाळांमधील ४ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी पॅड डिसपोजल पाऊचचे वाटप करत आहोत. त्याचबरोबर सॅनिटरी पॅड वापरून तसेच कचरापेटीत न टाकता ते सॅनिटरी पॅड डिस्पोजल पाऊच मध्ये टाकावे जेणेकरून रोगराई न पसरणार नाही. त्याचप्रमाणे पर्यावरणाचेही रक्षण होईल हाच संदेश शालेय विद्यार्थिनींना देण्यासाठी आम्ही सॅनिटरी पॅड डिसपोजल पाऊच तयार केले असून त्याचे लोकार्पण आज येथे करण्यात आले.

आम्ही आतापर्यंत १० शाळांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, डिस्पोजल मशीन, आणि मेन्स्ट्रुअल हेल्थ किट बसविले आहेत. त्याचबरोबर २ पोलीस स्टेशन्स आणि महापालिका के-पश्चिम वॉर्ड ऑफिस मध्येही सॅनिटरी पॅड एटीएम मशीन लावली आहे. महापालिका शाळांमधील गरीब आणि गरजू मुलींना सॅनिटरी पॅड परवडत नाहीत त्यामुळे अशा ४ हजार विद्यार्थिनींना मासिक पाळीमध्ये स्वच्छ, निरोगी अनुभव देण्यासाठी आम्ही मोफत सॅनिटरी पॅड आणि सॅनिटरी पॅड डिस्पोजल पाऊचचे वाटप केले."

आमदार विनायकराव मेटे म्हणाले की, " आज मासिक पाळी बद्दल उघडपणे चर्चा होते. ज्या गरीब स्त्रिया किंवा मुलींना सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नाही अशा महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड आणि डिस्पोजल पाऊच देण्याचा काम आमदार डॉ. लव्हेकर करत आहेत. आज मुंबईच्या महापालिका शाळांमधील ४ हजार विद्यार्थिनींना त्यांनी मोफत पॅड वाटपाचा कार्यक्रम घेतला याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. डॉ. लव्हेकर यांनी देशातील पहिली डिजिटल सॅनिटरी पॅड बँक सुरु केली आणि त्यांच्या या अभिनव कामाची दखल म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना ' फर्स्ट लेडी' ह्या पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच 'जागतिक महिला दिनी' विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवणा-या देशातील केवळ ४०० कर्तबगार महिलांना पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली असे मेटे यांनी शेवटी अभिमानाने सांगितले. 

Web Title: Do not hesitate to think about menstrual cycle - Shreyas Talpade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.