...म्हणून मिळत नाही झोपडपट्टीवासीयांना न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:04 AM2018-02-05T02:04:32+5:302018-02-05T02:04:48+5:30

एसआरएच्या अधिका-यांमुळे झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळत नाही, असा आरोप करीत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गृहनिर्माण सचिव संजीवकुमार यांना पत्र लिहिले आहे.

... do not get justice as slum dwellers | ...म्हणून मिळत नाही झोपडपट्टीवासीयांना न्याय

...म्हणून मिळत नाही झोपडपट्टीवासीयांना न्याय

Next

मुंबई : एसआरएच्या अधिका-यांमुळे झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळत नाही, असा आरोप करीत उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गृहनिर्माण सचिव संजीवकुमार यांना पत्र लिहिले आहे. एसआरए विभागातील अधिकारी वाईट घटनेची वाट पाहात असावेत, असा टोला त्यांनी पत्रात लगावला आहे.
मुंबई शहरात अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प असून येथे १९८९पासून पहिल्या मजल्यावर राहणाºया झोपडपट्टीवासीयांच्या घरांच्या पात्रतेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. परिणामी हा विषय प्रलंबित आहे. शासनाच्या निर्णयानुसार २०११पर्यंतच्या पात्र झोपडपट्टीधारकांना ३०० चौरसफुटांचे घर मिळणार आहे. परंतु त्याच वेळेस १९८०पासून पहिल्या माळ्यावर राहणारे झोपडपट्टीधारक अपात्र ठरत आहेत.
मालाड पूर्व ओम्कार प्रकल्पातील बाधित झोपडपट्टीधारक आपल्या न्याय व हक्कासाठी गेल्या दीड वर्षापासून लढा देत आहेत. खासदार शेट्टी हे गेल्या दीड महिन्यापासून सचिव संजीवकुमार यांच्याकडे या विषयाबाबत पाठपुरावा करत असूनही ते सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याची टीका त्यांनी आपल्या पत्रात केली आहे.
मुंबई शहरातील लाखो झोपडपट्टीधारक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एखादी वाईट घटना घडल्यानंतरच एसआरएच्या अधिकाºयांना जाग येणार आहे काय, असा सवालही त्यांनी पत्रातून विचारला आहे.
या प्रकरणी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

Web Title: ... do not get justice as slum dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.