हिवाळी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे गणित चुकले , तांत्रिक अडचण ठरली कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 06:39 AM2017-11-11T06:39:59+5:302017-11-11T06:40:14+5:30

मुंबई विद्यापीठात हिवाळी परीक्षा सुरू झाल्या असल्या तरी गोंधळ काही संपायचे नाव घेत नाही. कारण आता उत्तरपत्रिका तपासणीच्या लेटमार्कनंतर प्रश्नपत्रिकांचा गोंधळ सुरू झाला आ

Diagnosis of winter test papers, due to technical difficulties | हिवाळी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे गणित चुकले , तांत्रिक अडचण ठरली कारणीभूत

हिवाळी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे गणित चुकले , तांत्रिक अडचण ठरली कारणीभूत

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठात हिवाळी परीक्षा सुरू झाल्या असल्या तरी गोंधळ काही संपायचे नाव घेत नाही. कारण आता उत्तरपत्रिका तपासणीच्या लेटमार्कनंतर प्रश्नपत्रिकांचा गोंधळ सुरू झाला आहे. हिवाळी परीक्षेच्या तिसºया दिवशी प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. दुसरीकडे महाविद्यालयात डाऊनलोडिंगला उशीर झाल्याने प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत, असा खुलासा विद्यापीठाने केला आहे.
पुनर्मूल्यांकनाच्या निकालाचे आव्हान समोर असतानाच विद्यापीठाने बुधवार, ८ नोव्हेंबरला हिवाळी परीक्षा सुरू केल्या. वेळापत्रकानुसार शुक्रवारी एसवायबीकॉमच्या तिसºया सत्राच्या विद्यार्थ्यांचा फायनान्स आणि अकाउंट्सचा पेपर होता. सकाळी १० वाजता हा पेपर सुरू होणार होता. पण, मुंबईतल्या बºयाच महाविद्यालयांत प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने परीक्षा उशिरा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढला होता.
शुक्रवारचा पेपर सकाळी १० वाजता होता. पण, प्रश्नपत्रिका न पोहोचल्याने परीक्षा सुरू होण्यास विलंब झाला. अनेक महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका मिळाली नसल्याची माहिती त्वरित परीक्षा विभागात पोहोचली. त्यामुळे परीक्षा विभागात काळजीचे वातावरण पसरले. पण, महाविद्यालयांमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रश्नपत्रिका मिळाली नसल्याचे समजल्यावर परीक्षा विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रश्नपत्रिका १०च्या आत न मिळाल्याने परीक्षा उशिरा सुरू झाली. त्यामुळे विद्यार्थी तणावात होते. पेपर पूर्ण कसा होणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. पण, ज्या ठिकाणी परीक्षा उशिरा सुरू झाली तिथे विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ देण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून मिळाली.
तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका विलंबाने पोहोचल्या. काही ठिकाणी झेरॉक्स मशीन बंद पडल्यानेही प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढण्यास वेळ लागला. तर, दुसरीकडे काही परीक्षा केंद्रांवर मराठी भाषांतर केलेल्या प्रश्नपत्रिका मिळाल्या नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. याविषयी विद्यापीठाने भूमिका स्पष्ट करताना, महाविद्यालयात झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वेळेवर उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, असे सांगितले. विद्यापीठाने प्रश्नपत्रिका वेळेवर पाठवल्या होत्या. मराठीच्या प्रश्नपत्रिका महाविद्यालयात पोहोचल्या की नाही, याची शहानिशा करून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

Web Title: Diagnosis of winter test papers, due to technical difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.