मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) मुंबई विभागातील ८१९ सदनिकांच्या नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत २२ आॅक्टोबरपर्यंत आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात १० नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत निघणार आहे. सोडतीकरिता माहितीपुस्तिका व आॅनलाईन अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर अर्जदाराची नोंदणी २१ आॅक्टोबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास २२ आॅक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.