टँकर लॉबीमुळे अंधेरीत पाणीटंचाई; कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:42 AM2019-05-13T05:42:15+5:302019-05-13T05:42:28+5:30

पश्चिम उपनगरातील के. पूर्व भागातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची मुंबई महानगर पालिकेची योजना होती.

Dark water shortage due to tanker lobby; Since the low pressure water comes to the citizen, | टँकर लॉबीमुळे अंधेरीत पाणीटंचाई; कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक हैराण

टँकर लॉबीमुळे अंधेरीत पाणीटंचाई; कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक हैराण

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : पश्चिम उपनगरातील के. पूर्व भागातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची मुंबई महानगर पालिकेची योजना होती. वाढती लोकसंख्या, पाण्याची होणारी गळती व चोरी, यंदा कमी पाऊस पडल्याने पालिकेने केलेली १0 टक्के पाणीकपात, या विविध कारणांमुळे अंधेरी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईला, तसेच काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागते.
नगरसेवकांचा दिवस सुरू होतो, तो प्रामुख्याने वॉटर, मीटर व गटरांच्या तक्रारीने. नागरिकांना पर्यायी पाण्याची व्यवस्था देण्यासाठी त्यांना टँकरचे पाणी पालिकेमार्फत उपलब्ध करून देतात. हे चक्र दरवर्षी सुरूच असते. के. पश्चिम या प्रभागात प्रभाग क्रमांक ५९ ते ७१ असे १३ प्रभाग येतात. आमच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, असे येथील सर्वपक्षीय नगरसेवकांची तक्रार आहे.
के. पश्चिम विभागाची लोकसंख्या सुमारे ५,७०,००० च्या आसपास आहे. येथे अंधेरी पश्चिम व वर्सोवा हे दोन विधानसभा मतदार संघ या वॉर्डमध्ये मोडतात. येथील पाणीटंचाईबाबतीत के. पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक ७१चे भाजपा नगरसेवक अनिश मकवानी त्यांनी सांगितले की, माझ्या प्रभागात विलेपार्ले पश्चिमच्या साउथ कोंड गावठाण येथे दुपारी २.४५ ते ४ पर्यंत कमी दाबाने पाणी येते. एकंदरीत येथील विविध भागांतील असलेल्या पाणीटंचाईबाबत आपण लवकरच के. पश्चिम विभागाचे सहायक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड व येथील जलअभियंता यांच्याबरोबर बैठक घेणार असल्याचे मकवानी यांनी सांगितले.

टँकरच्या उपशाने विहिरी आटल्या
वेसावे गावातील विहिरी या गेल्या अडीच महिन्यापासून आटल्या आहेत. बोरींगना पाणी येत नाही. येथील पेडणेकर चाळीत पाणी नव्हते. गेले २ अडीच महिने तेथील बोरींगला पाणी येत नाही.
वेसावा येथे टँकरने जो पाण्याचा भरमसाट उपसा करणे सुरूच आहे. यावर काही निर्बंध ठेवले पाहिजेत. वेसावा गावातील, शिवगल्ली आणि यारी गल्लीतील संस्थांनी याला आळा घातला पाहिजे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले.
पालिकेचे के. पश्चिम विभागाचे उपजल अभियंता विपुल बागडे यांनी सांगितले की, मुंबईत सध्या १५ टक्के पाणीटंचाई आहे. येथील नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारी सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो.

प्रभाग क्रमांक ५९च्या शिवसेना नगरसेविका प्रतिमा खोपडे म्हणाल्या की, वर्सोवा भागात गढूळ पाणी येत असल्याचा तक्रारी आहेत. सागर कुटीर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. वर्सोवा येथील जुन्या असलेल्या विहिरीतून टँकर लॉबी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करते, यावर कोणाचे नियंत्रण नाही. मी या विरोधात प्रभाग समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता.

प्रभाग क्रमांक ६०चे भाजपा नगरसेवक योगिराज दाभाडकर म्हणाले की, लोखंडवाला व सरदार पटेलनगर येथे रात्री १० ते १ या वेळेत पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाणीटंचाई भेडसावत होती. यावर उपाय म्हणून सरदार पटेलनगर येथे रात्री १० ते ११.३० व लोखंडवाला येथे रात्री ११.३० ते १ या वेळेत पाणी वितरणाची विभागणी केली. परिणामी, पूर्वीपेक्षा येथील पाणीटंचाई कमी झाली. पालिकेच्या सध्याच्या १५ टक्के पाणीकपातीमुळे पाणीसमस्या निर्माण होते आहे.

प्रभाग क्रमांक ६१ मध्ये गणेशनगर, आनंदनगर, कदमनगर आणि अन्य भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, असे येथील शिवसेनेच्या नगरसेविका राजुल पटेल यांची तक्रार आहे.

प्रभाग क्रमांक ६२चे शिवसेना नगरसेवक राजू पेडणेकर यांच्या वैशालीनगर, पाटीलपुत्र, हरयाणा वस्ती, काजूपाडा या भागात पाणीटंचाई असल्याचे त्यांनी
सांगितले.

प्रभाग क्रमांक ६३च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील यांच्या विकानगर व शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई असल्याचे त्यांनी
सांगितले.

प्रभाग क्रमांक ६४च्या शिवसेनेच्या नगरसेविका शायदा हारून खान यांनी सांगितले की, केवणी पाडा, आंबोली, सरोटा पाडा, यादवनगर, बांदिवली हिल, कॅप्टन सामंत मार्ग, हिल पार्क, विरा देसाई रोड या अनेक भागांत पाण्याचा दाब कमी आहे.

प्रभाग क्रमांक ६५च्या काँग्रेसच्या नगरसेविका अल्पिता जाधव म्हणाल्या की, पाणीटंचाई होती. मात्र, यावर मात करण्यासाठी मी गेली दोन वर्षे प्रयत्न केले. आंबोली येथील आदिवासी पाडे व चाळ वस्तींना पाणी येत नव्हते. तिथे जलवाहिनी टाकून पाण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिली. सीझर रोड ते जेपी रोड व जेपी रोड ते भवन्स कॉलेज, जनता कॉलनी ते गिल्बर्ट हिल या भागात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम
सुरू आहे. त्यामुळे येथील पाणीटंचाईची समस्या मिटेल. के. पश्चिम विभागात टँकर लॉबीला पाणी मिळते, पण नागरिकांना मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. भरडा
वाडीत खासगी विहिरीतून टँकर लॉबी पाण्याचा उपसा करते. जर के. पश्चिममधील टँकर लॉबीला आळा घातल्यास येथील पाणीटंचाई कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक ६६च्या काँग्रेसच्या नगरसेविका मिहीर मोहसीन हैदर यांनी सांगितले की, ‘माझ्या प्रभागातील उंचावर असलेल्या डोंगर वस्तीला पाणी पोहोचत नाही.’

प्रभाग क्रमांक ६८चे भाजपा नगरसेवक रोहन राठोड यांनी सांगितले की, त्यांच्या प्रभागातील जीत नशर, नवजीतनगर, जुहू वर्सोवा लिंक रोड, कपासवाडी येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.

प्रभाग क्रमांक ६९च्या भाजपा नगरसेविका रेणू हंसराज यांच्या नेहरूनगर, गावठाण १, २ व ३ येथे पाण्याचा दाब कमी असून, गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी आहे. जेव्हीपीडी १ ते ६ मध्ये पालिकेचा कंत्राटदार नसल्याने पाण्याची जलवाहिनी बंद आहे.

Web Title: Dark water shortage due to tanker lobby; Since the low pressure water comes to the citizen,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी