दापचरी दुग्ध प्रकल्पाला संजीवनी, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:10 AM2018-09-28T02:10:34+5:302018-09-28T02:10:48+5:30

मुंबईला दूधाचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी १९६४ ला महाराष्ट्र शासनाने आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ डहाणू तालुक्यातील दापचरी येथे रोवली.

 Dapchari Dairy Project will get employment opportunity for Sanjivani and local landmakers | दापचरी दुग्ध प्रकल्पाला संजीवनी, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणार

दापचरी दुग्ध प्रकल्पाला संजीवनी, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळणार

googlenewsNext

डहाणू  - मुंबईला दूधाचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी १९६४ ला महाराष्ट्र शासनाने आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ डहाणू तालुक्यातील दापचरी येथे रोवली. नियोजन शून्य कारभार व शासनाची उदासीनतेमुळे कोट्यावधीचा हा प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे. तोट्यात सुरु असलेला हा प्रकल्प राज्य सरकार बासनात गुंडाळणार आणि स्थानिकांनाही जमीन परत देणार अशी चर्चा होत असताना या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रालयाने केला आहे. प्रस्तावित देशी गायींचा बिझनेस क्लब निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र दापचरी दुग्ध प्रकल्पाला त्याबाबत कोणताही आदेश प्राप्त झालेला नसल्याचे कार्यालयाकडुन समजते. तसेच कोणतीही हालचाल दिसून येत नाही.
सद्यस्थितीत असलेल्या या प्रकल्पाच्या तबेल्यामधे जिल्हा नियोजन मंडळाद्वारे देशी वाण असलेल्या ५०० बहूमूल्य गायींना येथे ठेवण्यात येईल. त्यामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या गिर व थारपारकर या गायींचा समावेश असेल. १७० युनीटधारकांपैकी बहुसंख्यकांनी हे युनीट गुजरात मुंबई येथील धनाढ्य लोकांना विकले आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात केसेस सुरु आहेत.

आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रकल्प

गोमूत्र व शेणापासून आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य प्रसादने तसेच पंचगव्य तयार करण्यात येणार आहेत. यामुळे स्थानीकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिति करण्याचे धोरण आहे, हा आदेश लवकरच जारी होईल. ही माहिती राज्यमंत्री खोतकर यांनी दिली.

Web Title:  Dapchari Dairy Project will get employment opportunity for Sanjivani and local landmakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.