धोकादायक झाडे ठरणार नाहीत मृत्यूचे कारण; महापालिकेचा नवीन आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 01:08 AM2019-01-30T01:08:18+5:302019-01-30T01:08:40+5:30

धोकादायक झाडे ओळखणे, फांद्यांची छाटणी करणे आणि वेळ पडल्यास ते झाड पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने नवीन आराखडा तयार केला आहे.

Dangerous trees will not be the cause of death; The new plan of the corporation | धोकादायक झाडे ठरणार नाहीत मृत्यूचे कारण; महापालिकेचा नवीन आराखडा

धोकादायक झाडे ठरणार नाहीत मृत्यूचे कारण; महापालिकेचा नवीन आराखडा

Next

मुंबई : मृत्यूचा सापळा ठरणाऱ्या धोकादायक झाडांनी गेल्या पावसाळ्यात सात पादचाºयांचे बळी घेतले. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाने झाडांची मुळे कमकुवत झाल्याने हा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. धोकादायक झाडे ओळखणे, फांद्यांची छाटणी करणे आणि वेळ पडल्यास ते झाड पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाने नवीन आराखडा तयार केला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये रस्त्यावरील झाडे पावसाळ्यात अचानक कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेकडून वेळीच धोकादायक झाड अथवा फांद्या छाटण्यात येत नसल्याने पादचाºयांच्या जीवावर बेतत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सन २०१८ मध्ये झाडे कोसळून सात नागरिक मृत्युमुखी पडले असून २१ जण जखमी झाले.

या दुर्घटनांचे तीव्र पडसाद उमटल्यामुळे महापालिकेने यापुढे धोकादायक झाडांची छाटणी करताना वनस्पतीशास्त्रज्ञ व बागकामशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरात या कामाला सुरुवात होणार आहे. कीड लागलेले, आजारी झाडे वेळीच ओळखून त्यांची छाटणी न केल्याने पावसाळ्यात जोरात वाहणाºया वाºयामुळे ही झाडे पडतात. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने अशा झाडांच्या धोकादायक फांद्या नवीन नियमांनुसार छाटण्यात येणार आहेत.

आजारी झाडांवर कीटकनाशक फवारणी
जून ते सप्टेंबर २०१८ - ५१० झाडे आणि १०७७ फांद्या पडल्या. यापैकी खाजगी जमिनीवरील ३६७ झाडे कोसळली तर ७०० फांद्या पडल्या.
नवीन कंत्राटानुसार खाजगी परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय व निम शासकीय आवारातील धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येईल.
सर्व झाडांचे सर्वेक्षण करून आजारी झाडांना वाचविण्यासाठी त्यांच्यावर कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे.
दोन वर्षे सर्व २४ विभागांमधील झाडांची काळजी व धोकादायक झाडांच्या छाटणीचे कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी ११७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

झाडांची आकडेवारी...
वृक्ष गणनेनुसार मुंबईत एकूण २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरामध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.

Web Title: Dangerous trees will not be the cause of death; The new plan of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.