डबेवाल्यांची आॅनलाईन सेवा

By admin | Published: July 28, 2015 02:37 AM2015-07-28T02:37:43+5:302015-07-28T02:37:43+5:30

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर www.dabewale.com या मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

Dabewali's online service | डबेवाल्यांची आॅनलाईन सेवा

डबेवाल्यांची आॅनलाईन सेवा

Next

मुंबई : आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर  www.dabewale.com या मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. आॅनलाईन विश्वातील प्रवेशाने आता डबेवाल्यांची सेवा एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे.
मुंबईकरांच्या सेवेत हे संकेतस्थळ दाखल झाले आहे. या संकेतस्थळावर डबेवाल्यांचा वाटचालीचाही आढावा घेण्यात आला आहे. शिवाय, ‘मॅनेजमेंट गुरु’ही ओळख डबेवाल्यांना कशी प्राप्त झाली, याविषयी माहिती देण्यात आली आहे. आता येत्या काळात डबेवाल्यांच्या व्यवसायाचा निश्चित विस्तार होईल, असा विश्वास जेवण डबे वाहतूक मंडळाचे सरचिटणीस सुभाष तळेकर यांनी व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या विश्वात हळुहळू प्रगती करण्यात येईल, असेही त्यांनी आर्वजून सांगितले. (प्रतिनिधी)

डबा असा मागवा...
-एखाद्या ग्राहकाला डब्याची सेवा हवी असल्यास त्याने संकेतस्थळाला भेट द्यावी.
-या संकेतस्थळावर तुम्हाला तुमच्या जवळच्या रेल्वे स्टेशनवर, गल्लीत, विभागात किंवा इमारतीत कोणता डबेवाला येतो, याची माहिती मिळेल. या डबेवाल्याचा संपर्क क्रमांकही तुम्हाला इथे मिळेल.
-यानंतर इच्छुक ग्राहकाची माहिती घेऊन त्यांना डबा पोहोचवण्याची सेवा तातडीने दिली जाईल.

Web Title: Dabewali's online service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.