निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ‘कपात’; पालिका रुग्णालयांतील २ हजार डॉक्टरांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:52 AM2018-02-11T03:52:49+5:302018-02-11T03:53:06+5:30

पालिका रुग्णालयांतील दोन हजार निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय का, असा संतप्त सवाल मध्यवर्ती मार्ड संघटनेने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राज्य सरकारच्या अंतर्गत असणाºया वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामधून टीडीएस कापण्यात आलेला नाही.

'Cut' in resident doctor's education; The question of 2,000 doctors in municipal hospitals | निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ‘कपात’; पालिका रुग्णालयांतील २ हजार डॉक्टरांचा सवाल

निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ‘कपात’; पालिका रुग्णालयांतील २ हजार डॉक्टरांचा सवाल

Next

मुंबई : पालिका रुग्णालयांतील दोन हजार निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय का, असा संतप्त सवाल मध्यवर्ती मार्ड संघटनेने शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला. राज्य सरकारच्या अंतर्गत असणाºया वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामधून टीडीएस कापण्यात आलेला नाही.
राज्य शासन असो वा पालिका रुग्णालय या ठिकाणी काम करणाºया निवासी डॉक्टरांना विद्यावेतन दिले जाते. मात्र राज्य शासन आणि पालिका रुग्णालयाच्या अंतर्गत असणाºया या निवासी डॉक्टरांना मिळणाºया विद्यावेतनात भेदाभेद केल्याचे नुकतेच उघड झाले आहे. जानेवारी महिन्यात मिळालेल्या विद्यावेतनात २५ हजार रुपये टीडीएसची रक्कम म्हणून कापण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात याप्रमाणे १८ हजार रुपये कापण्यात येतील, अशी माहिती मध्यवर्ती मार्ड संघटनेचे सचिव डॉ. राजेश कतरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यानंतर भविष्यात टप्प्याटप्प्याने ही रक्कम ४ हजार रुपयांपर्यंत कापण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सरकारी यंत्रणेप्रमाणे निवासी डॉक्टर हा घटक ‘कर्मचारी’ या गटात मोडत नाही. त्यामुळे मग विद्यावेतनामधून टीडीएस कापण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. शिवाय, जर पालिकेच्या यंत्रणेप्रमाणे निवासी डॉक्टरांचा विद्यावेतनामधून टीडीएस कापत असेल तर पालिका कर्मचाºयांप्रमाणे सुटी, मासिक वैद्यकीय खर्च,अन्य सुविधाही आम्हाला द्यावात, असेही डॉ. कतरे यांनी सांगितले.
मार्डच्या संघटनेची भूमिका लक्षात घेऊन याविषयी कागदपत्रे पडताळण्यात येतील. शिवाय, पालिकेच्या यंत्रणांशी याविषयी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पालिकेच्या रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.

Web Title: 'Cut' in resident doctor's education; The question of 2,000 doctors in municipal hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर