सीएसएमटी रंगणार नवरात्रीच्या रंगात, घटस्थापनेसाठी मुंबईकर सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 02:55 AM2017-09-21T02:55:00+5:302017-09-21T02:55:01+5:30

घटस्थापनेसाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे विशेष महत्त्व असते. यामुळे या रंगामध्ये रंगून जाण्यासाठी भाविक विशेष तयारी करतात. भाविकांप्रमाणे यंदा मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीची ऐतिहासिक इमारतदेखील नऊ रंगात उजळताना दिसणार आहे.

CSMT to be painted in Navaratri's colors, Mumbai-based ready for installation | सीएसएमटी रंगणार नवरात्रीच्या रंगात, घटस्थापनेसाठी मुंबईकर सज्ज

सीएसएमटी रंगणार नवरात्रीच्या रंगात, घटस्थापनेसाठी मुंबईकर सज्ज

Next


महेश चेमटे 
मुंबई : घटस्थापनेसाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ रंगाचे विशेष महत्त्व असते. यामुळे या रंगामध्ये रंगून जाण्यासाठी भाविक विशेष तयारी करतात. भाविकांप्रमाणे यंदा मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीची ऐतिहासिक इमारतदेखील नऊ रंगात उजळताना दिसणार आहे.
प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त सीएसएमटीला तिरंगी प्रकाशयोजनेत झळकण्याचा मान मिळतो. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ रंगामध्ये इमारत झळकणार आहे. जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा भेदभाव कधीही मुंबई करत नाही. मुंबईकर नेहमीच सर्व सणांमध्ये एकरूप होऊन सणांचा आनंद द्विगुणित करतो. सीएसएमटीमधून रेल्वेला कोट्यवधींचा महसूल मिळतो. परिणामी, मुंबईचा ऐतिहासिक भाग असलेल्या सीएसएमटीलादेखील सणांमध्ये सहभागी करण्याची योजना मध्य रेल्वे प्रशासनाने आखली आहे. रेल्वे अधिकाºयांनी ही कल्पना मांडताच म.रे.च्या महाव्यवस्थापकांनीदेखील या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिली आहे.
घटस्थापनेच्या दिवशी सीएसएमटी पिवळ्या रंगात झळकणार आहे. त्यानंतर अनुक्रमे हिरवा, करडा, नारिंगी, पांढरा, लाल, निळा, गुलाबी, जांभळा या रंगात सीएसएमटीची इमारत उजळून निघणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने विविधरंगी प्रकाशयोजनेसाठी उच्च प्रतीच्या लाईट्स कार्यान्वित केलेली आहे. यामुळे तिरंग्यात उजळून दिसणारी सीएसएमटीची इमारत नऊ रंगात झळकणार आहे.

‘संकटावर मात करून विजयोत्सव साजरा करणे म्हणजे नवरात्री’. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ऐतिहासिक इमारतीचे महत्त्व आहे. देशभरातील रेल्वे सेवा प्रवाशांसाठी उत्सवकाळातदेखील अविरत सुरू राहते; किंबहुना अविरत सेवा देऊन उत्सवात सहभागी होते. भारतीय रेल्वे ही आधुनिकतेकडे झेपावत आहे. परिणामी, भविष्यातील विविध अडचणी दूर करून भारतीयांना विशेषत: मुंबईकरांना ‘रेल्वेच्या आधुनिकतेचा उत्सव लवकरच साजरा करण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी सीएसएमटीची इमारत नवरात्रीच्या रंगात उजळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सुनील उदासी,
मुख्य जनसंपर्क अधिकारी
>दिवस वार रंग
२१ सप्टेंबर गुरुवार पिवळा
२२ सप्टेंबर शुक्रवार हिरवा
२३ सप्टेंबर शनिवार करडा
२४ सप्टेंबर रविवार नारिंगी
२५ सप्टेंबर सोमवार पांढरा
२६ सप्टेंबर मंगळवार लाल
२७ सप्टेंबर बुधवार निळा
२८ सप्टेंबर गुरुवार गुलाबी
२९ सप्टेंबर शुक्रवार जांभळा

Web Title: CSMT to be painted in Navaratri's colors, Mumbai-based ready for installation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.