अर्धवट गाडी क्रमांकावरून लावला गुन्ह्याचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:19 AM2018-02-17T03:19:18+5:302018-02-17T03:19:29+5:30

असायनमेंट संपवून अंबोली परिसरातून रात्री उशिरा घरी परतणाºया एका महिला पत्रकाराचा पाठलाग करणा-या दोन महाभागांच्या अवघ्या सहा तासांत मुसक्या आवळण्यात आल्या. मुख्य म्हणजे स्कूटीवरून पसार होणा-या त्या दोघांचा पाठमोरा फोटो तिने मोबाइलमध्ये टिपला.

 The crime car hit the half-car | अर्धवट गाडी क्रमांकावरून लावला गुन्ह्याचा छडा

अर्धवट गाडी क्रमांकावरून लावला गुन्ह्याचा छडा

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई :असायनमेंट संपवून अंबोली परिसरातून रात्री उशिरा घरी परतणाºया एका महिला पत्रकाराचा पाठलाग करणा-या दोन महाभागांच्या अवघ्या सहा तासांत मुसक्या आवळण्यात आल्या. मुख्य म्हणजे स्कूटीवरून पसार होणा-या त्या दोघांचा पाठमोरा फोटो तिने मोबाइलमध्ये टिपला. ज्यात गाडीचा नंबर पोलिसांना मिळाला; परंतु त्यातले शेवटचे दोन अंक ‘मिसिंग’ होते. अर्धवट माहितीच्या आधारे गुन्हेगारांना शोधणे हे खºया अर्थाने एक ‘हार्ड टास्क’ होते. मात्र तगड्या नेटवर्कच्या आधारे त्या दोघांचा गाशा आवळण्यात अंबोली पोलिसांना यश आले.
या घटनेनंतरही पाठलागाचे दोन प्रकार त्या परिसरात घडले. मात्र त्याचाही छडा अंबोली पोलिसांनी अगदी काही तासांत लावत आरोपींना बेड्या ठोकल्या. मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका फोडणाºया कॉलेजच्याच अधिकाºयाला अटक केली. मात्र नेहमीच ‘हॅपनिंग’ असलेल्या या पोलीस ठाण्याच्या कर्तृत्वाचे खरे श्रेय जाते ते अंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड आणि त्यांच्याकडे असलेल्या ‘दयास्त्र’ म्हणजे पोलीस उपनिरीक्षक आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना.
वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पोलीस ठाण्यामार्फत केले जाणारे ‘टीम वर्क’ प्रत्येक प्रकरणाचा छडा लावण्यात त्यांना उपयुक्त ठरते. ज्याचे उदाहरण मॉडेल कृतिका चौधरी हत्याकांड आहे. ज्यात अवघ्या सहा हजारांसाठी तिची हत्या दोन ‘ड्रग पेडलर्स’कडून करण्यात आली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात याच टीम वर्कमुळे अंबोली पोलिसांना यश मिळाले होते.

‘त्या’ प्रकाराची खंत!
अंबोली परिसरातून एक गाडी चोरीला गेली होती. ज्याची तक्रार वेळीच दाखल न केल्यामुळे त्याच गाडीचा वापर शहरात शस्त्रसाठा आणण्यासाठी करण्यात आला. मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी आग्रा-मुंबई महामार्गावर हे प्रकरण उघडकीस आणले. या सगळ्यात अंबोली पोलिसांना नाचक्की सहन करावी लागली होती.
या प्रकरणी हलगर्जीपणा करणाºया प्रमोद काटे आणि गणेश देवकाटे या दोन पोलीस उपनिरीक्षकांचे निलंबन करण्यात आले. त्या दोघांनी वेळीच गाडीचोरीची तक्रार दाखल करून घेतली असती तर कदाचीत अजून एक मानाचा तुरा अंबोली पोलिसांच्या शिरपेचात खोवला गेला असता. त्यामुळे त्या प्रकाराबाबत अंबोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आजही खंत व्यक्त करतात.

आमचे वरिष्ठ पोलीस उपायुक्त परमजीतसिंह दहिया तसेच अन्य वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि आमच्या विशेष पथकाचा भाग असलेले दया नायक तसेच स्टाफच्या सकारात्मक आणि मेहनती वृत्तीमुळेच मोठमोठ्या प्रकरणांचा छडा लावणे आम्हाला शक्य होते. आमचे टीम वर्क हीच आमची ताकद आहे.
- भरत गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबोली)

मनुष्यबळ
१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, २८ अधिकारी, ११३ अंमलदार म्हणजे एकूण १४२ पोलीस साडे
तीन लाखांहून अधिक लोकसंख्येची कायदा व सुव्यवस्था सांभाळत आहेत.

परिमंडळ : ९
परमजीतसिंह दहिया
लोकसंख्या : ३.५ लाख
तक्रारीसाठी संपर्क
भरत एस. गायकवाड
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पोलीस ठाणे : २६७६२००१/०२/०३

बीट चौकी : ३
दादासाहेब गायकवाड हॉल, वीरा देसाई रोड, मालकम बाग

Email : ps.amboli.mum@mahapolice.gov.in

Web Title:  The crime car hit the half-car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा