Corona In Maharashta: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात ८ हजार ७०२ नवे बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 09:47 PM2021-02-25T21:47:45+5:302021-02-25T21:48:56+5:30

Covid-19 In Maharashtra: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

Corona blast in Maharashtra 8 thousand 702 new infected in last 24 hours | Corona In Maharashta: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात ८ हजार ७०२ नवे बाधित

Corona In Maharashta: महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट! दिवसभरात ८ हजार ७०२ नवे बाधित

Next

Covid-19 In Maharashtra: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कारण सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ८ हजारपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८ हजार ७०२ नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. 

राज्यात मुंबई, नागपूर, पुणे, अमरावती, यवतमाळ, अकोला या शहरांमध्ये कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील कोरोना मृत्यूंचा आकडा ५१ हजार ९९३ वर पोहोचला आहे. 

राज्यात सध्या सक्रिय कोरोना रुग्ण किती?
राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ६४ हजार २६० वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांचा हा आकडा काळजी वाढवणारा आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख २९ हजार ८२१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील २० लाख १२ हजार ३६७ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.४९ टक्के इतकं आहे. 

मुंबईत आज १ हजारांहून अधिक रुग्ण
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १ हजार १४५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ४६३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. 
 

Web Title: Corona blast in Maharashtra 8 thousand 702 new infected in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.