काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड ! - विखे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 02:15 PM2017-12-01T14:15:37+5:302017-12-01T14:19:23+5:30

मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे

Congress office foiled attack! - Vikhe Patil | काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड ! - विखे पाटील

काँग्रेस कार्यालयावरील हल्ला भ्याड ! - विखे पाटील

Next
ठळक मुद्देमुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांचा हल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे'केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला'

मुंबई - मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र निषेध करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, 'हा हल्ला अत्यंत भ्याड स्वरुपाचा होता. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे सांगतानाच विरोधी पक्षनेत्यांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.  

मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सीएसटीएम येथील कार्यालयावर सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.  मनसे नेता संदीप देशपांडे यांनी टि्वट करुन  हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक. इट का जवाब पथ्थर से मिलेगा.. असे टि्वट त्यांनी केले. दरम्यान पोलिसांनी कारवाई करत संदिप देशपांडे यांच्यासह सात ते आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी करारा जवाब मिलेगा असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून संजय निरुपम यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 'मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष मुख्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन फक्त 25 मीटर अंतरावर आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर चोख उत्तर देण्यात येईल', असा इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे. संजय निरुपम सध्या गुजरातमध्ये आहेत.

'कार्यकर्त्यांना रोज फेरीवाल्यांकडून मार खावा लागत असल्याने मी मनसेची निराशा समजू शकतो. त्यांनी आमच्या कार्यालयावर केलेला हल्ला भ्याड आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाई करावी अन्यथा चोख प्रत्युत्तर देण्यात येईल', असं संजय निरुपमांनी सांगितलं आहे. 
 

Web Title: Congress office foiled attack! - Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.