स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:09 AM2017-12-30T02:09:31+5:302017-12-30T02:09:45+5:30

मुंबईकरांनी अ‍ॅपच्या माध्यमातून कॉल न दिल्याने स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई मागे पडली होती. नवी मुंबई, पुण्यासारख्या छोट्या शहरांनीही या स्पर्धेत मागे टाकल्यानंतर हायटेक पावले उचलणा-या महापालिकेला अखेर मेहनतीचे फळ मिळाले आहे.

Complaints about cleanliness app | स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींचा ओघ

स्वच्छता अ‍ॅपवर तक्रारींचा ओघ

googlenewsNext

मुंबई : मुंबईकरांनी अ‍ॅपच्या माध्यमातून कॉल न दिल्याने स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई मागे पडली होती. नवी मुंबई, पुण्यासारख्या छोट्या शहरांनीही या स्पर्धेत मागे टाकल्यानंतर हायटेक पावले उचलणा-या महापालिकेला अखेर मेहनतीचे फळ मिळाले आहे. महिन्याभरात ६२ हजार मुंबईकरांनी स्वच्छतेचे अ‍ॅप डाऊनलोड केले असून त्यावर तक्रारींचा पाऊस पडत आहे. अस्वच्छ परिसराच्या ४६ हजार तक्रारी नोंदविल्या आहेत.
केंद्र सरकारने २०१४ मध्ये स्वच्छता अभियान जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशभर ही मोहीम सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीला दीडशे वर्षे २०१९ मध्ये पूर्ण होत आहेत. त्यापूर्वी भारत देश स्वच्छ व हागणदारीमुक्त करण्याचा केंद्राचा निर्धार आहे. मात्र या मोहिमेत मुंबई मागे पडली आहे. स्वच्छता सर्वेक्षणात २०१५ मध्ये १९ व्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर गेल्या वर्षी २९ व्या क्रमांकापर्यंत घसरले. पालिकेने त्याबाबत केलेली कामे केंद्र सरकार व नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचा निष्कर्ष काढल होता. या वेळी सर्वेक्षणाच्या महिन्याभरापूर्वी पालिकेने नेटकºयांची जुळवाजुळव सुरू केली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आवाहन केल्यानंतर तब्बल ६२ हजार लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. ४६ हजार लोकांनी आपल्या परिसरातील अस्वच्छतेची तक्रार केली आहे. यापैकी ४४ हजार पाचशे तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. उर्वरित दीड हजार तक्रारी लवकरच सोडविण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिले आहे.
>बारा तासांत होणार कारवाई
पालिकेने नेमलेल्या संस्थेचे प्रतिनिधी लोकांना भेटून मुंबईतील स्वच्छतेबाबत त्यांचे मत व प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. त्याबाबतच्या मोबाइल अ‍ॅपद्वारे नोंदविलेल्या तक्रारींच्या निराकरणासाठी महापालिकेच्या वरळी अभियांत्रिकी संकुलात नियंत्रण कक्ष सुरू आहे.
गेल्या वर्षी स्वच्छता मोबाइल अ‍ॅपचे १८ हजार ६७४ युजर्स नवी मुंबईत आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात ११ हजार ६७४ लोक हे अ‍ॅप वापरतात. मुंबईत मात्र ही संख्या केवळ नऊ हजार २५२ इतकीच होती. सोशल प्रचारामुळे आता ही संख्या ६२ हजारवर पोहोचली आहे.
गेल्या वेळेस अ‍ॅपद्वारे झालेल्या सर्वेक्षणात देशातील ४३४ शहरांनी सहभाग घेतला होता. सर्वेक्षणात दोन हजार गुणांपैकी दीडशे गुण मोबाइल अ‍ॅपसाठी राखीव होते. कचरा उचलणे, घनकचरा व्यवस्थापन, शौचालयांचे बांधकाम आदी निकष निश्चित करण्यात आले होते. त्याचबरोबर स्वच्छतासंदर्भात अ‍ॅपवर आलेल्या
नागरिकांच्या तक्रारींची दखल पालिका किती वेळेत घेते, याकडे केंद्राच्या समितीचे लक्ष होते. गूगल प्ले स्टोअर/अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून Swachhata-MoHUA App डाऊनलोड करून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेबाबत तक्रार करता येणार आहे. अस्वच्छ ठिकाणाचे फोटो काढून या अ‍ॅपद्वारे पाठविल्यास मुंबई महापालिका १२ तासांच्या
आत कारवाई करणार आहे.

Web Title: Complaints about cleanliness app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.