कोकेन, एमडी तस्कर रडारवर

By admin | Published: December 30, 2015 03:37 AM2015-12-30T03:37:58+5:302015-12-30T03:37:58+5:30

थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हायप्रोफाइल पार्ट्यांवर पोलिसांची नजर आहे.

Cocaine, MD smoker radar | कोकेन, एमडी तस्कर रडारवर

कोकेन, एमडी तस्कर रडारवर

Next

- मनीषा म्हात्रे,  मुंबई
थर्टीफर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हायप्रोफाइल पार्ट्यांवर पोलिसांची नजर आहे. हायप्रोफाइल पार्ट्यांमध्ये कोकेनखालोखाल एमडीचा वापर होतो. त्यामुळे अमली पदार्थ पुरवणारे तस्कर सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत.
तरुणांना पब, हॉटेलकडे आकर्षित करण्यासाठी इव्हेंट कंपन्या फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. त्यामुळे सगळी माध्यमे पोलिसांच्या रडारवर असल्याचे पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. शिवाय अमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हानही पोलिसांसमोर असते. यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. आयोजक कंपन्यांकडून ‘रेव्ह पार्टी’ असा थेट उल्लेख न करता, वेगवेगळ्या प्रकारचे कोडवर्ड वापरले जातात.
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने गेल्या ११ महिन्यांत १७ हजार ६४८ गुन्हे दाखल करून १९ हजार ११६ आरोपींना अटक केली आहे. तस्करांकडून १२ कोटी ५७ लाख ८८ हजार ८६० रुपये किमतीचे ६९८ किलो १६ हजार ८६३ ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये कोकेन, एमडी, गांजा, हेरॉईन, चरससह अन्य अमली पदार्थांचा समावेश आहे.
कुलाबा, वांद्रे, कफ परेड, मलबार हिल, लोखंडवाला, पवई अशा ठिकाणी या हायप्रोफाइल पार्ट्यांचे आयोजन होण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. गुन्हे शाखेची सहा पथके अमली पदार्थ तस्करांवर लक्ष ठेवून आहेत. खबऱ्यांमार्फत घरांमध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांवरही नजर ठेवणार असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त जयंत नाईकनवरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

मुंबई पोलिसांची वर्षभरातील कारवाई
प्रकारगुन्हेआरोपीकिलोग्रॅम किंमत
हेरॉईन २६ ३६ २३३ ४५३ ७,४१,००,०००
चरस २३ २५ २३ १७०७ ३३,८३,३००
कोकेन २९ ३४ ०१ २७८ ८७,६५,७००
गांजा १०९ १२९ ४१० ९४५८ ४४,०१,०१०
अन्य ८६ ११८ ३१ ४९६७ ३,५१,३८,८५०
नशेखोर१७,३७५ १८,७७४ - - -

Web Title: Cocaine, MD smoker radar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.