दिमाखात पार पडले ख्रिसमस सेलिब्रेशन, ‘सांता’कडून मिळालेल्या भेटवस्तू आणि गोडधोड मेजवानीत मुंबईकर दंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:04 AM2017-12-26T02:04:10+5:302017-12-26T02:04:13+5:30

मुंबई : मुंबईवर पसरलेली गुलाबी थंडीची चादर, त्यात ख्रिसमसच्या निमित्ताने ‘सांता’कडून मिळालेल्या भेटवस्तूंचे कौतुक आणि गोडधोड मेजवानीत मुंबईकर दंग झाल्याचे चित्र आहे.

Christmas Celebration in the Blind, 'Santa', gifts received by 'Santa' and 'Mumbaikar riots' | दिमाखात पार पडले ख्रिसमस सेलिब्रेशन, ‘सांता’कडून मिळालेल्या भेटवस्तू आणि गोडधोड मेजवानीत मुंबईकर दंग

दिमाखात पार पडले ख्रिसमस सेलिब्रेशन, ‘सांता’कडून मिळालेल्या भेटवस्तू आणि गोडधोड मेजवानीत मुंबईकर दंग

Next

मुंबई : मुंबईवर पसरलेली गुलाबी थंडीची चादर, त्यात ख्रिसमसच्या निमित्ताने ‘सांता’कडून मिळालेल्या भेटवस्तूंचे कौतुक आणि गोडधोड मेजवानीत मुंबईकर दंग झाल्याचे चित्र आहे. ख्रिस्ती बांधवांच्या या सणानिमित्त मुंबई शहर आणि उपनगरातील चर्च गर्दीने फुलून गेली होती.
चर्च परिसराच्या जोडीला व्यापारी आस्थापना, मॉल्ससुद्धा रंगीबेरंगी बनले आहेत. आकर्षक दिव्यांच्या माळा, पताके, विविध आकारांचे फुगे, सांताक्लॉजच्या वेषातील उत्साही मंडळी आणि जोडीला उंच-उंच ‘ख्रिसमस ट्री’ अशा वातावरणात ख्रिसमसचे सेलिब्रेशन करण्यात आले. या सेलिब्रेशनच्या जोडीलाच दीन-दुबळे, गरजूंना मदतीचा हात देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले.
>मुंबईत बरीच जुनी व प्रमुख मोठी चर्च आहेत. येथे पारंपरिक पद्धतीने ख्रिसमस साजरा केला जातो. कुलाबा येथील होली नेम कॅथड्रेल, भायखळा येथील ग्लोरिया चर्च, माहिम येथील सेंट मिशेल चर्च, वांद्रे येथील माउंट मेरी बॅसिलिका, सेंट पिटर्स चर्च, बोरीवली येथील लेडी आॅफ इमॅक्युलेट कन्सेप्शन येथे, तसेच इतर चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमसचे सेलिबे्रशन करण्यात आले.
>वांद्रे पश्चिमेकडील बँड स्टँड येथील फादर एग्नेल आश्रमात उत्साहात ख्रिसमस साजरा केला गेला. या वेळी २४ डिसेंबरला रात्री ९.३० वाजता कॅरोल गायनाचा कार्यक्रम झाला. रात्री १० वाजता मास म्हटली गेली. त्यानंतर, रात्री ११.३० वाजता केक कापून तोंड गोड करण्यात आले. अनेक ख्रिस्ती बांधवांनी आश्रमातील अनाथ मुलांना निधीच्या रूपात मदत केली, तर २५ डिसेंबर रोजी सकाळी ७, ८ आणि ९.३० वाजता मास म्हणण्यात आली. वांद्रे पश्चिमेकडील माउंट मेरी चर्चमध्ये २४ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता मास म्हणण्यात आली. त्यानंतर, सगळ्यांनी एकमेकांना भेटून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, केक आणि चहापानाचा बेत आखला गेला. माउंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसला दरवर्षीप्रमाणे विविध भागांतून ख्रिश्चन बांधवांनी मोठ्या संख्येने येऊन भेटी दिल्या.मानखुर्दमध्ये ४०० वर्षे जुने सेंट अँथोनी चर्च आणि सेंट अल्फान्सो (मल्याळी) असे दोन चर्च आहेत. या दोन्ही चर्चमध्ये मानखुर्द, ट्रॉम्बे, देवनार, गोवंडी, अणुशक्तिनगर, महाराष्ट्रनगर, मानखुर्द गाव येथील लोक प्रार्थनेसाठी येतात. सेंट अँथोनी चर्चमध्ये हजाराहून अधिक लोक दाखल होतात, तर शेजारीच असलेल्या सेंट अल्फान्सो चर्चमध्ये तीनशेहून अधिक दक्षिण भारतीय जमले होते. सायंकाळी ८ वाजता चर्चमध्ये मास करण्यात आली. त्यानंतर, सर्वांना केकचे वाटप करण्यात आले. लहान मुलांनी येशूची स्तुती करणारी विविध भक्तिगीते गाऊन सर्वांची मने जिंकली. दादर येथील पोर्तुगीज चर्च (अवर लेडी आॅफ साल्वेशन) मध्ये ख्रिसमस साजरा करण्यासाठी आणि प्रभू येशूची प्रार्थना करण्यासाठी शेकडो मुंबईकर जमलेले पाहायला मिळाले. चर्चमधील माससाठी हजाराहून अधिक लोक आले होते.
>स्पर्धा आणि सभारंभ : ख्रिसमसच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात होते. या वेळी सकाळच्या प्रार्थनेला चार प्रकारच्या मेणबत्त्या दर आठवड्याला लावल्या जातात. ख्रिसमसच्या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांच्या घरामध्ये वेगवेगळ््या प्रकारच्या चविष्ट मेजवानी, त्यात शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही पद्धतीचे जेवण केले गेले. घरोघरी पार्टीचा बेत आखला गेला होता. अनेक प्रकारचे लज्जतदार पदार्थ बनविण्यात आले. आठवडाभर ख्रिसमसमध्ये मुलांना शाळेला सुट्टी पडल्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धांचे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले गेले आणि यात लहान मुले, तरुण मंडळी यांनी सहभाग घेतला, तसेच कुटुंबातील सदस्यांनी सांताक्लॉज बनून एकमेकांना व विशेषता लहान मुलांना गिफ्ट दिले.
>कॅरोल गाण्यांची धून : ख्रिसमसच्या वेळी चर्चमध्ये चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी कॅरोल गीत सादर करण्यात आले. ख्रिस्ती तरुणांनी एकत्र येऊन ख्रिसमसची गाणी गायली, तसेच येशू ख्रिस्तांचा जन्म झाला, तो प्रसंग नाटिकेच्या माध्यमातून सादर करण्यात आला.
>कार्निव्हल रॅली : सध्या कार्निव्हलचे फॅड आहे. कार्निव्हलमध्ये उंट, घोडे, पारंपरिक वेशभूषा करून रॅली काढली गेली, याला ‘कार्निव्हल रॅली’ असेदेखील म्हटले जाते.
>चर्चमधील ख्रिसमस : २४ डिसेंबरच्या रात्री १० ते १२ वाजता चर्चमध्ये मास म्हटली गेली. मासनंतर सर्वांनी एकमेकांना भेटून ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. दरम्यान, गोडाधोडासह केक कापून सर्वांनी आनंद लुटला. काहींनी वैयक्तिक पार्टीचेदेखील आयोजन केले.
>भेटवस्तू : नाताळमध्ये खाण्याच्या पदार्थामध्ये इंडेल, फुगे आणि तांदळाचे वडे ही पारंपरिक खाद्यपदार्थ बनवून आस्वाद घेतला गेला. केक आणि चॉकलेट्स इत्यादी भेटवस्तूच्या रूपात लहान मुलांना आणि प्रियजनांना दिले गेले. दरम्यान, लहान मुलांना सांताक्लॉजची वेशभूषा धारण करून भेटवस्तूंचे वाटप केले.
>मरोळ येथील सेंट जॉन इव्हेंजेलिस्ट चर्चमध्ये मोठ्या उत्साहात ख्रिसमस सेलिब्रेशन करण्यात आले. या उत्सवातही सामाजिक भान राखत, यंदा अनाथ, गरीब, दीन-दुबळ्या लोकांच्या मदतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
चर्चमधील कॅरोल गीत आणि मासनंतर सर्वांना खाद्यपदार्थ देण्यात आले. येशूचे क्रिब (पाळणा) तयार करण्यात आले होते. येथे येशू यांचा जन्म कशा प्रकारे झाला, याची माहिती प्रतिकृतीच्या माध्यमातून दाखविण्यात आली.
>घरांची सजावट
ख्रिसमसमध्ये ख्रिस्ती बांधव घरा-घरांमध्ये रोशणाई करून आनंदोत्सव साजरा करतात. ख्रिसमस ट्री, फुगे, कंदील आणि पताका अशा प्रकारच्या सजावटीचे साहित्य आणून घर सजविण्यात आले.

Web Title: Christmas Celebration in the Blind, 'Santa', gifts received by 'Santa' and 'Mumbaikar riots'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.