चौपाट्यांची यापुढे यांत्रिकी सफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:38 AM2017-12-08T01:38:14+5:302017-12-08T01:38:19+5:30

वर्साेवा चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेने मुंबईतील सर्व चौपाट्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्यामुळे सर्व चौपाट्यांच्या सफाईबाबत कठोर नियमावली आणण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे

Chowpatty's no longer mechanical cleaning | चौपाट्यांची यापुढे यांत्रिकी सफाई

चौपाट्यांची यापुढे यांत्रिकी सफाई

googlenewsNext

मुंबई : वर्साेवा चौपाटीवरील स्वच्छता मोहिमेने मुंबईतील सर्व चौपाट्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आणला. त्यामुळे सर्व चौपाट्यांच्या सफाईबाबत कठोर नियमावली आणण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार यापुढे यांत्रिकी संसाधनाचा वापर करून चौपाट्यांची सफाई केली जाणार आहे.
भरतीच्या काळात समुद्रातून वाहत येणाºया कचºयामुळे चौपाट्यांची कचराकुंडी होते. मात्र चौपाट्यांची सफाई करणाºया ठेकेदारांचे कामगार अर्धवट सफाई करतात. त्यामुळे चौपाट्यांची अवस्था बकाल असून पर्यटकांचीही गैरसोय होते. वर्साेवा चौपाटीच्या सफाईची मोहीम स्वयंसेवी कार्यकर्ता अफरोज शाह यांनी चालविली. मात्र त्यांच्या मोहिमेत असामाजिक तत्त्वांकडून अडथळा आल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती. याचे तीव्र पडसाद उमटून पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागले होते. त्यामुळे पालिकेने स्वत:चे सफाईचे काम हाती घेतले आहे. जुहू चौपाटीवर २० आणि वर्साेव्याला १२ कामगारांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेनुसार ठेकेदाराला वाढविता येणार आहे.
जुहू येथे रेतीतून कचरा वेचणारी एकूण तीन तर वर्साेवा दोन मशीन लावण्याची परवानगी आहे. संपूर्ण चौपाटीची यांत्रिकी पद्धतीने सफाई शक्य आहे का? याचीही चाचपणी सुरू आहे.

दंडामध्ये करणार वाढ
वर्साेवा येथे सफाईसाठी १२ कामगार तर जुहू चौपाटीवर २० कामगार नेमण्याची परवानगी आहे. कामगारांची संख्या गरजेनुसार ठेकेदारांना वाढविता येईल.
रेतीतून कचरा वेचणाºया सध्या दोन मशीन जुहूमध्ये आहेत. यात वाढ करून तीन तर वर्साेव्यात एक मशीन आहे, त्यात वाढून करून दोन करण्यात येणार आहे.
सध्या प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर पाचशे रुपये दंड आहे. यात वाढ करून उन्हाळा व हिवाळ्यात शंभर मीटर अंतरासाठी एक हजार रुपये तर त्यापुढे प्रत्येक शंभर मीटरसाठी आणखी एक हजार रुपये दंड असणार आहे. पावसाळ्यात हा दंड आणखी वाढेल.

Web Title: Chowpatty's no longer mechanical cleaning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.