चिपी विमानतळाचे ५ मार्चला उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:26 AM2019-03-03T03:26:21+5:302019-03-03T03:26:43+5:30

प्रत्येक सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न असलेले चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

Chili Airport inauguration on March 5 | चिपी विमानतळाचे ५ मार्चला उद्घाटन

चिपी विमानतळाचे ५ मार्चला उद्घाटन

googlenewsNext

मुंबई : प्रत्येक सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न असलेले चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री
सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोकोपयोगी योजना व उपक्रमांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील आठ ते पंधरा दिवसात या विमानतळावरून प्रत्यक्ष विमानांचे उड्डाण होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटन उद्योग वाढीस फायदा होणार आहे.
विमानतळाच्या उद्घाटनाबरोबरच चांदा ते बांदा योजनेतील बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र, आनंदवाडी प्रकल्प यांचे भूमीपूजन, सिंधुदुर्गमधील सीसीटीव्ही प्रकल्प, देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण, चांदा ते बांदा योजनेतील कृषी यांत्रिकीकरण, एस. आर. ए, पशुसंवर्धन व पिंजरा शेती प्रकल्पातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप, पोलिसांना स्वत:च्या घरासाठी गृह कर्जाचे वितरण आदी कार्यक्रमही होणार आहेत.
तसेच आयुष्यमान भारत, श्रमयोगी योजनेचा शुभारंभही होणार आहे. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण व भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार होणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.

Web Title: Chili Airport inauguration on March 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.