सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:33 AM2018-08-14T05:33:15+5:302018-08-14T05:33:33+5:30

आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सिडकोमार्फत महागृहनिर्माण योजना राबविली जाणार असून तब्बल १४ हजार ८३८ घरे बांधण्यात येणार आहेत.

Chief Minister inaugurated the process of filing of nominations for CIDCO's homes | सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ  

सिडकोच्या घरांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा मुख्यमंत्र्यांकडून शुभारंभ  

Next

मुंबई  - आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सिडकोमार्फत महागृहनिर्माण योजना राबविली जाणार असून तब्बल १४ हजार ८३८ घरे बांधण्यात येणार आहेत. या घरांच्या आॅनलाइन सोडतीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. पुढच्या टप्प्यात आणखी २५ हजार घरांची सोडत वर्षाअखेरीस जाहीर करण्यात येणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देऊन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोने एक लाख घरे बांधण्यांचे उद्दिष्ट ठेवावे, असे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, प्रत्येकाला घरे देण्याच्यायोजनेत सिडकोसुद्धा सहभागी झाली असून नवी मुंबई परिसरात त्यांनी आता ही घरांची योजना सुरू केली आहे. यामुळे गरिबांना चांगल्या किंमतीत व चांगल्या ठिकाणी पायाभूत सुविधांसह घरे मिळणार आहेत.

सिडकोच्या योजनेत प्रथमच आॅनलाईन अर्ज नोंदणी.
सिडकोतर्फे नवी मुंबईतील तळोजा, द्रोणगिरी, खारघर, घणसोली, कळंबोली या पाच नोडमधील ११ ठिकाणच्या घरांचा समावेश आहे.
१४ हजार ८३८ घरांपैकी ५ हजार २६२ घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर ९ हजार ५७६ घरे अल्प उत्पन्न घटकांसाठी आहेत.
प्रत्यक्ष अर्ज नोंदणीस १५ आॅगस्टपासून असन १६ सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. घरासाठी अडीच लाख अनुदान आहे. अर्जांची योग्य छाननी करून गरजूनांच घरे मिळवीत. सामान्य माणसांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असे फडणवीस यांनी सांगितले.

चार तासांमध्ये १४५८६ नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे. तर तब्बल ४४५० जणांनी आॅनलाइन नोंदणी केली असल्याची माहिती सिडको प्रशासनाने दिली आहे.

 

Web Title: Chief Minister inaugurated the process of filing of nominations for CIDCO's homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.