नादुरुस्त मीटर तत्काळ बदला, ग्राहकांना अचूक बिल वेळेत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 05:50 AM2018-05-13T05:50:15+5:302018-05-13T05:50:15+5:30

केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे महावितरण आता अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या महसुलातही वाढ होणार असून

Change the faulty meter immediately, customers will get the exact bill on time | नादुरुस्त मीटर तत्काळ बदला, ग्राहकांना अचूक बिल वेळेत मिळणार

नादुरुस्त मीटर तत्काळ बदला, ग्राहकांना अचूक बिल वेळेत मिळणार

Next

मुंबई : केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे महावितरण आता अधिक गतिमान होणार आहे. त्यामुळे महावितरणच्या महसुलातही वाढ होणार असून, ग्राहकांना अचूक व वेळेत बिल मिळणार आहे, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी संचालक श्रीकांत जलतारे यांनी दिली. भांडुप नागरी परिमंडळात आयोजित महावितरण अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
केंद्रीकृत बिलिंग प्रणालीमुळे आता ग्राहकांच्या रीडिंगचा सर्व डेटा मुख्यालयातील सर्वरला सेव्ह होऊन तेथूनच त्याच्यावर अचूक बिलिंग होण्याकरिता पुढील प्रोसेसिंग होणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. ग्राहकांना योग्य बिलिंग होण्याकरिता इलेक्ट्रोमॅग्नेटिक व नादुरुस्त मीटर लवकरात लवकर बदलावेत. यामुळे वीजहानी कमी होऊन महावितरणच्या महसुलात वाढ होणार आहे.
कोकण विभागाचे प्रादेशिक संचालक सतीश करपे यांनी उपस्थित अधिकाºयांना वीज विक्री वाढ होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना केल्या. मुख्य अभियंता पुष्पा
चव्हाण यांनी भांडुप नागरी परिमंडळाच्या माहितीचे सादरीकरण केले. या वेळी ठाणे नागरी मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वाहणे, वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर मानकर, ग्राहकसेवा
केंद्राच्या अधीक्षक अभियंता साधना खांडेकर, उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार, भांडुप विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश थूल, मुलुंड विभागाच्या कार्यकारी अभियंता सारिका खोब्रागडे, ठाणे १ विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र हरळकर, ठाणे २ विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक थोरात, ठाणे ३ विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग हुंडेकरी, वाशी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण अन्नछत्रे, नेरूळ विभागाचे कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता अजितकुमार तांबडे, प्रणाली विश्लेषक अर्चना प्रेमसागर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर, जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, तसेच भांडुप नागरी परिमंडळातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Change the faulty meter immediately, customers will get the exact bill on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.