शिक्षक मतदार संघात चंद्रकांत पाटील नावाचा बोलबाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 06:04 AM2018-06-17T06:04:13+5:302018-06-17T06:04:13+5:30

मुंबई शिक्षक मतदार संघात सध्या चंद्रकांत पाटील यांच्याच नावाचा बोलबाला आहे. चंद्रकांत बाजीराव पाटील हे मुंबईच्या शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

Chandrakant Patil has dominated the voter's constituency! | शिक्षक मतदार संघात चंद्रकांत पाटील नावाचा बोलबाला!

शिक्षक मतदार संघात चंद्रकांत पाटील नावाचा बोलबाला!

googlenewsNext

मुंबई : मुंबई शिक्षक मतदार संघात सध्या चंद्रकांत पाटील यांच्याच नावाचा बोलबाला आहे. चंद्रकांत बाजीराव पाटील हे मुंबईच्या शिक्षक मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाचे साधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरच्या मुलांच्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत.
नाव साधर्म्यामुळे पाटील यांच्या नावाची शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, त्यांनी सुरू केलेल्या गाठीभेटींमध्येही नाव साधर्म्यासह त्यांच्या कामामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पाटील म्हणाले की, शिक्षक म्हणून अध्यापनासोबतच सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉइज को-आॅप क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. याशिवाय बृहन्मुंबई विभाग क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ आणि मुंबई जिल्ह्याच्या असोसिएशन आॅफ योगाच्या अध्यक्षपदी काम करत आहे. या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून विविध समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता विधान परिषदेतही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले.
या आधी शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीतील चुरस अधिककच वाढली आहे. भाजपाचा विचार केल्यास भाजपकडून अनिल देशमुख रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे तगडी लढत होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तरीही भाजपा आणि शिक्षक परिषदेतील वादांचा फटका देशमुख यांना बसण्याची शक्यता आहे.
>अपक्ष उमेदवारांचीही चलती
जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावर जुनी पेन्शन हक्क संघटनेने संघटनेचे मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांना रिंगणात उतरविले आहे, तर मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिक्षक भारतीचे विद्यमान आमदार कपिल पाटील यांच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. पाटील यांच्या गटातील नाराज सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मत विभाजनाचा फटका नेमका कुणाला बसणार? याची शाश्वती नसल्याने, अपक्ष उमेदवारांचीही यंदाच्या निवडणुकीत चांगलीच चलती असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Chandrakant Patil has dominated the voter's constituency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.