मोटरमनच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 06:41 AM2018-08-11T06:41:31+5:302018-08-11T06:41:40+5:30

मोटरमननी शुक्रवारी पहाटेपासूनच ओव्हरटाइम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांचे हाल झाले.

Central Railway passengers due to motor vehicle protests | मोटरमनच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे प्रवाशांचे हाल

मोटरमनच्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे प्रवाशांचे हाल

Next

मुंबई : मोटरमननी शुक्रवारी पहाटेपासूनच ओव्हरटाइम करण्यास नकार दिल्याने मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांचे हाल झाले. तब्बल ४० लाखांपेक्षा जास्त प्रवाशांना वेठीस धरल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास मध्य रेल्वे आणि मोटरमन संयुक्त कृती समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या आश्वासनानंतर मोटरमन संघटनांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, या आंदोलनामुळे एकूण २00 लोकल फेऱ्या रद्द झाल्या, तर शेकडो लोकल फेºया विलंबाने धावत होत्या. दरम्यान, प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल-एक्स्प्रेसला अतिरिक्त थांबा दिल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान मध्य रेल्वे आणि मोटनमन संघटना यांच्यातील बैठकीत सिग्नल ओलांडणे व अन्य मागण्यांबाबत १४ आॅगस्ट रोजी पुन्हा मध्य रेल्वे व सेंट्रल रेल्वे मजदूर संघ यांची बैठक बोलावण्यात आली आहे.

Web Title: Central Railway passengers due to motor vehicle protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई