कोचर दाम्पत्याला सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी; जबाब देण्यास टाळाटाळ, तपासात सहकार्य नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 06:28 AM2022-12-25T06:28:40+5:302022-12-25T06:29:38+5:30

कोचर दाम्पत्य जबाब देण्यास टाळाटाळ करत असून, तपासाला सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

cbi custody of chanda kochhar and deepak kochhar couple till monday | कोचर दाम्पत्याला सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी; जबाब देण्यास टाळाटाळ, तपासात सहकार्य नाही!

कोचर दाम्पत्याला सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी; जबाब देण्यास टाळाटाळ, तपासात सहकार्य नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आयसीआयसीआयच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व त्यांचे पती दीपक कोचर यांना बँकेने मंजूर केलेल्या कर्जामध्ये फसवणूक व अनियमितता केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. शुक्रवारी रात्री दोघांना अटक झाली. 

कोचर दाम्पत्य जबाब देण्यास टाळाटाळ करत असून, तपासाला सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉन समूहाचे वेणुगोपाळ धूत, न्यू पॉवर रिन्युअबल कंपनी, सुप्रीम एनर्जी, व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लि., हे या प्रकरणात आरोप आहेत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, आयसीआयसीआय बँकेने बँकिंग नियमन कायदा, आरबीआय मार्गदर्शक तत्त्वे आणि बँकेच्या पत धोरणाचे उल्लंघन करून धूत यांनी प्रमोट केलेल्या व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: cbi custody of chanda kochhar and deepak kochhar couple till monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.