कमला मिल आग प्रकरण : विशाल कारिया करून देणार होता सेटिंग, सात दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:46 AM2018-01-11T02:46:25+5:302018-01-11T02:46:43+5:30

कमला मिल आगप्रकरणानंतर हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाने वन अबव्हच्या तिन्ही फरार संचालकांना तीन दिवस स्वत:च्या घरी ठेवल्याची माहिती समोर येत आहे, तसेच या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तपास यंत्रणांसोबत सेटिंग करून देण्याचे आश्वासन त्याने दिल्याचाही संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. बुधवारी न्यायालयाने त्याला १७ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Caterpillar Mill Fire Case: Setting up the giant carriages, seven-day police closet | कमला मिल आग प्रकरण : विशाल कारिया करून देणार होता सेटिंग, सात दिवसांची पोलीस कोठडी

कमला मिल आग प्रकरण : विशाल कारिया करून देणार होता सेटिंग, सात दिवसांची पोलीस कोठडी

Next

मुंबई : कमला मिल आगप्रकरणानंतर हॉटेल व्यावसायिक विशाल कारियाने वन अबव्हच्या तिन्ही फरार संचालकांना तीन दिवस स्वत:च्या घरी ठेवल्याची माहिती समोर येत आहे, तसेच या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तपास यंत्रणांसोबत सेटिंग करून देण्याचे आश्वासन त्याने दिल्याचाही संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. बुधवारी न्यायालयाने त्याला १७ तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुहू येथील रहिवासी असलेला कारिया हॉटेल व्यावसायिक आहे. फेसबुकवर त्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह अभिनेता संजय दत्त, शाहरुख खान, तसेच क्रिकेटपटू हरभजन सिंग याच्यासोबतचे फोटो अपलोड केले आहेत. त्याचे राजकीय नेत्यांसह क्रिकेटपटूंसोबत जवळचे संबंध आहेत. कमला मिल आगीच्या घटनेनंतर २९ डिसेंबरच्या पहाटे साडेतीन वाजता क्रिपेश संघवीने त्याची आॅडी कार कारियाच्या घरी आणून दिली. या दरम्यान तीन दिवस ते कारियाच्याच घरी असल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या ओळखीचा फायदा घेत, पोलिसांसोबत सेटिंग करून देण्याबाबतचे आश्वासन त्याने तिघांना दिले होते. त्यासाठी त्याची धडपड सुरू असल्याचा संशय पोलिसांना आहे.
अभिजित मानकरच्या आॅडीसह मंगळवारी त्याला जुहूमधून अटक करण्यात आली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असेता न्यायालयाने १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वन अबव्हचे तीन संचालक क्रिपेश संघवी, जीगर संघवी, अभिजित मानकर कोठे लपून आहेत, याबाबतची सर्व माहिती कारीयाला आहे. मात्र, तो ती लपवत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचे कॉल रेकॉर्डही तपासण्यात येत आहेत.

युग तुली हैदराबादमध्ये
फरार संचालकांच्या शोधासाठी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे ५ ते ७ पथक विविध ठिकाणी रवाना झाले आहे, तर मोजोस बिस्ट्रोचा मालक युग पाठकला अटक केल्यानंतर, त्याचा भागीदार युग तुलीचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वी तपासात सहकार्य करणारा युग तुली हैदराबादला फरार झाला. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथ हैदराबादमध्ये तळ ठोकून आहे.

Web Title: Caterpillar Mill Fire Case: Setting up the giant carriages, seven-day police closet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.