आंदोलनप्रकरणी पालघरमध्ये गुन्हा दाखल, चर्चगेटकडे जाणारी लोकल अडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:12 AM2018-01-06T06:12:29+5:302018-01-06T06:12:38+5:30

भीमा-कोरेगाव येथे शौर्यिदन साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांवर काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यात करण्यात आलेल्या बंद दरम्यान आंदोलकांनी पालघर रेल्वे स्टेशन वर लोकल अडविल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला

 In the case of agitation, lodged a complaint in Palghar, local blocked at Churchgate | आंदोलनप्रकरणी पालघरमध्ये गुन्हा दाखल, चर्चगेटकडे जाणारी लोकल अडवली

आंदोलनप्रकरणी पालघरमध्ये गुन्हा दाखल, चर्चगेटकडे जाणारी लोकल अडवली

Next

पालघर  - भीमा-कोरेगाव येथे शौर्यिदन साजरा करण्यासाठी जमलेल्या लोकांवर काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यात करण्यात आलेल्या बंद दरम्यान आंदोलकांनी पालघर रेल्वे स्टेशन वर लोकल अडविल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून नालासोपारा पोलिसांनीही एका दुकानांची नासधूस केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
३ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंद ची हाक दिल्यानंतर पालघर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटून पालघर, डहाणू, तलासरी, विक्र मगड, जव्हार, मोखाडा, वाडा, वसई ह्या आठ तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. पालघर मध्ये सकाळ पासून शांततेत सुरू असलेल्या बंद नंतर दुपारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यासाठी हुतात्मा स्तंभाजवळ जमलेल्या आंदोलन कर्त्यांनी पालघर स्टेशन वर आपला मोर्चा वळवला. ह्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकाºयांनी ह्या आंदोलकांना लोकल ट्रेन अडविण्यास मज्जाव केला. मात्र चर्चगेट कडे जाणारी लोकल थांबल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ट्रेन पुढे उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली होती.
ह्या प्रकरणी अज्ञात आंदोलकांवर बेकायदेशीररित्या धरणे आंदोलन करणे, लोकल ट्रेन अडविणे या प्रकरणी रेल्वे सुरक्षा कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी मोहमद अख्तर अली ह्यांनी लोकमतला दिली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु आहे.

दुकान फोडले

च्ह्या बंदमध्ये नालासोपारा येथील एक दुकान फोडून नुकसान केल्याप्रकरणी काही अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयाने दिली.
ह्या बंद मुळे एसटी, रिक्षा, कारखाने, हॉटेल्स, मॉल, चित्रपटगृहे आदी व्यवसायातून कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे.

Web Title:  In the case of agitation, lodged a complaint in Palghar, local blocked at Churchgate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई