विद्यार्थ्यांचा वांद्रे येथील कार्टर रोडवर मेणबत्ती मोर्चा; ‘मर्डर ऑफ मेरिट’ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 06:45 AM2019-04-15T06:45:27+5:302019-04-15T06:45:34+5:30

एमबीबीएसनंतर एमडी, एमएस अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षेत राखीव आरक्षण राबविण्याकरिता वैद्यकीय विद्यार्थी, एमबीबीएस डॉक्टर आणि इंटर्न राज्यव्यापी निषेध करत आहेत.

Candle's Candle on Carter Road in Bandra; 'Murder of merit' campaign | विद्यार्थ्यांचा वांद्रे येथील कार्टर रोडवर मेणबत्ती मोर्चा; ‘मर्डर ऑफ मेरिट’ मोहीम

विद्यार्थ्यांचा वांद्रे येथील कार्टर रोडवर मेणबत्ती मोर्चा; ‘मर्डर ऑफ मेरिट’ मोहीम

googlenewsNext

मुंबई : एमबीबीएसनंतर एमडी, एमएस अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी पोस्ट ग्रॅज्युएट परीक्षेत राखीव आरक्षण राबविण्याकरिता वैद्यकीय विद्यार्थी, एमबीबीएस डॉक्टर आणि इंटर्न राज्यव्यापी निषेध करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरातील पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी वांद्रे येथील कार्टर रोडवर विद्यार्थी व पालकांनी एकत्र येत मेणबत्ती मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
आरक्षणासंबंधी अंमलबजावणीतील सध्याच्या घाईने, एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेता, आरक्षणावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आरक्षणासंदर्भातील दोन विधेयकांमुळे मेरिटमध्ये येणाºया विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार असून यासंबंधी ‘मर्डर आॅफ मेरिट’ ही मोहीम सुुरू आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील विद्यार्थी १६ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० वाजता पीजी आरक्षणाविरोधात मूक मोर्चा काढणार आहेत.
याविषयी विद्यार्थ्यांनी सांगितले की, निषेध कोणत्याही जाती किंवा वर्गाच्या विरुद्ध नाही, तर तो आरक्षणाच्या संस्थात्मकतेच्या विरोधात आहे. जर समाजाला घडवायचे असेल तर त्या समाजाने मेरिटची कदर केली पाहिजे, तरच आपल्या आरोग्यव्यवस्थेला सोनेरी दिवस येतील.

Web Title: Candle's Candle on Carter Road in Bandra; 'Murder of merit' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.