घरगुती सिलिंडरच्या गैरवापराविरुद्ध मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:55 AM2018-03-15T04:55:03+5:302018-03-15T04:55:03+5:30

घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या विरोधात लवकरच राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत व्यावसायिक वापर आढळून आल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिला.

Campaign against misuse of domestic cylinders | घरगुती सिलिंडरच्या गैरवापराविरुद्ध मोहीम

घरगुती सिलिंडरच्या गैरवापराविरुद्ध मोहीम

googlenewsNext

मुंबई : घरगुती गॅसच्या व्यावसायिक वापराच्या विरोधात लवकरच राज्यभर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेत व्यावसायिक वापर आढळून आल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज विधानसभेत दिला.
अमरावती शहरात तसेच जिल्ह्यात घरगुती गॅसचा होत असलेल्या अवैध वापराबाबत विधानसभेत प्रा. वीरेंद्र जगताप यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर बापट यांनी सांगितले की, रेशन दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत केली जाते. त्याप्रमाणे घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचना केल्या जातील. गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन ही कारवाई करावी लागेल.

Web Title: Campaign against misuse of domestic cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.