बिबट्यांना अडविणार ‘कॅमेरा ट्रॅपिंग’, जंगलबाह्य ठिकाणी १२ कॅमेऱ्यांचे ट्रॅपिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 07:15 AM2018-05-27T07:15:20+5:302018-05-27T07:15:20+5:30

मुंबईसह ठाणे शहराच्या येऊर, उल्हासनगरमधील लोकवस्त्यांमध्ये बिबट्या शिरल्याच्या घटना ताज्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Camera Trapping, Streets of 12 Cameras Trapped | बिबट्यांना अडविणार ‘कॅमेरा ट्रॅपिंग’, जंगलबाह्य ठिकाणी १२ कॅमेऱ्यांचे ट्रॅपिंग

बिबट्यांना अडविणार ‘कॅमेरा ट्रॅपिंग’, जंगलबाह्य ठिकाणी १२ कॅमेऱ्यांचे ट्रॅपिंग

Next

- सुरेश लोखंडे
ठाणे - मुंबईसह ठाणे शहराच्या येऊर, उल्हासनगरमधील लोकवस्त्यांमध्ये बिबट्या शिरल्याच्या घटना ताज्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जनमानसातील ही भीती दूर करण्यासाठी वनविभागासह वन्यजीव सुरक्षा संस्थांंनी आता शहरांच्या जंगलबाह्य ठिकाणी विविध स्वरूपांचे १२ कॅमेºयांचे ट्रॅपिंग केले आहे. या कॅमेºयांमुळे बिबट्यांच्या हालचाली टिपल्या जाणार असून, वस्तीत शिरण्यापूर्वी त्यांना अटकाव करणे शक्य होणार आहे.
बिबट्याने मुरबाडच्या जंगलात करवंदे तोडणाºया आदिवासीवर नुकताच हल्ला केला. पंज्याचे ओरखडे अंगावर आजही दिसून येत आहेत, तर मार्चमध्ये उल्हासनगरमधील दाट लोकवस्तीत बिबट्या दडून बसल्याचे अनुभवले आहे. याशिवाय, मुलुंडच्या नानेपाडा या आदिवासी वस्तीत जानेवारीत बिबट्या आढळला. तर, डिसेंबरमध्ये अंधेरीच्या शेर-ए-पंजाब हाउसिंग सोसायटीतदेखील त्याने शिरकाव केल्याच्या घटना ताज्या आहेत. या आधी तर मुलुंडच्या सिंधी कॉलनीत बिबट्याचा वावर लोकांनी अनुभवला, तर जवळच्या शंकर टेकडीतील लहान मुलीला फरफटत नेल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. मुरबाडला शेळ्यांसह जनावरांना ठार करणाºया बिबट्याने गुराख्यावरदेखील हल्ला केल्याच्या घटनांची नोंद वनविभागाकडे आहे.
मुलुंड, ठाणे परिसरातील वस्त्यांमध्ये शिरणारे बिबटे संजय गांधी राष्टÑीय उद्यानातील आहे. यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील मुलुंड, भांडुप, ठाण्याचे येऊर या बेल्टमध्ये, तर पश्चिमेच्या घोडबंदर रोड, दहिसर, कांदिवली, मालाड आदी ठिकाणी उद्यानाच्या बाह्यबाजूला सुमारे १२ कॅमेºयांचे ट्रॅपिंग केले आहे. यामध्ये नऊ फ्लॅश कॅमेºयांसह तीन इन्फ्रारेड कॅमेºयांचा समावेश आहे. या कॅमेºयांमुळे बिबट्यांच्या हालचाली अभ्यासासाठी उपयुक्त ठरणार असल्या, तरी फ्लॅश कॅमेºयांद्वारे लोकवस्तीत शिरणारा बिबट्या जंगलाच्या दिशेने वळऋवणे शक्य होणार असल्याचे, या कॅमेरा ट्रॅपिंगच्या अभ्यास समितीमधील ट्रॅकचे अध्यक्ष नितेश पांचोली यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या संरक्षित परिसराच्या बाह्यबाजूकडील ‘इंटेन्सिव्ह कॅमेरा ट्रॅपिंग अभ्यास’ प्रकल्पात संजय गांधी उद्यानाचे उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, वनअधिकारी संतोष कंक आणि ट्रॅक या वन्यजीव प्राणी सुरक्षा संस्थेचे अध्यक्ष नितेश पांचोली यांच्यासह त्यांच्या अन्य पदाधिकाºयांचा समावेश आहे. ठाणे-मुंबईच्या परिसरासह हा कॅमेरा ट्रॅपिंग अभ्यास प्रकल्प शहापूर, मुरबाड, जव्हार आणि अलिबाग आदी परिसरांतील जंगलांमध्ये सुमारे तीन कॅमेºयांचेदेखील ट्रॅपिंग केले आहे.

रेडिओ कॉलरचाही वापर

- याशिवाय, राष्टÑीय उद्यानाद्वारे रेडिओ कॉलरचा वापर करून, बिबट्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. रेडिओ कॉलरद्वारे मिळणारे सिग्नल उपग्रहाकडे जाऊन नोंदविण्यात येत असल्याची चर्चा आहे.
- या आधी अहमदनगर वनविभागाने बिबट्यांमध्ये रेडिओ कॉलर बसविलेल्या बिबट्यांपैकी ‘आजोबा’ नावाच्या बिबट्याने माळशेज घाटातून सुमारे १२५ किलोमीटर प्रवास करून, तो मुलुंडच्या पूर्वेकडील लोकवस्तीत शिरल्याची माहिती रेडिओ कॉलरमुळे कळल्याची तज्ज्ञांकडून ऐकायला मिळत आहे.
 

Web Title: Camera Trapping, Streets of 12 Cameras Trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.