राज्यात अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:27 AM2017-10-25T05:27:18+5:302017-10-25T05:27:20+5:30

मुंबई : अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यात अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

The Cabinet approved the implementation of food processing policy in the state | राज्यात अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

राज्यात अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

googlenewsNext

मुंबई : अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी राज्यात अन्न प्रक्रिया धोरण लागू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यामुळे कृषी उत्पादनांना स्थानिक बाजारपेठेपासून थेट आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत बाजारपेठ उपलब्ध होण्यासह शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृषी व फलोत्पादन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ कार्यरत राहील. त्यामध्ये पणन मंत्री, उद्योग मंत्री, पशुसंवर्धन-दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री, सहकार मंत्री, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री आणि संबंधित अधिकारी हे सदस्य असतील. कृषी प्रक्रिया उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी दोन स्वतंत्र संचालनालये स्थापन करण्यात येतील.
केंद्र व राज्याच्या विविध अनुदानांचा लाभ मिळवून देणे, उद्योगांना नवीन बाजारपेठ व तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे इत्यादींसाठी कृषी आयुक्तालयामध्ये अन्न प्रक्रिया संचालनालय स्थापन करण्यात येणार आहे. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये गुंतवणूकदारांना संबंधित सेवा पुरविण्यासाठी जिल्हा स्तरावर ई-प्लॅटफॉर्म आधारित एक खिडकी पद्धत सुरू करण्यात येणार आहे. कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे.

Web Title: The Cabinet approved the implementation of food processing policy in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.