Business Development Essential for Social Development - Amrita Fadnavis | सामाजिक विकासासाठी व्यवसायिक विकास आवश्यक- अमृता फडणवीस
सामाजिक विकासासाठी व्यवसायिक विकास आवश्यक- अमृता फडणवीस

मुंबई : सामाजिक विकासासाठी व्यवसायिक विकास अत्यंत आवश्यक आहे. जैन समाजाने या देशात आजपर्यंत जे प्रयत्न केले त्यामुळेच समाजात विकासाची संधी वाढली आहे, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. त्या मुंबईत इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन (जितो) द्वारा आयोजित बिझनेस कॉनक्लेव अंड ट्रेड अफेअर ‘जितो उडान’च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.

गोरेगाव पूर्व येथील नॅशनल एक्जीबिशन सेंटर नेक्सा येथे आयोजित ‘जितो उडान’ भारताच्या विकासाचा आरसा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. अमृता फडणवीस यांनी ध्वजारोहण, दीप प्रज्वलित करून आणि रिबीन कापून जितो उडान चे उद्घाटन केले. याप्रसंगी जितो एपेक्सचे चेअरमन प्रदीप राठोड, व्हाईस चेअरमन सुखराज नाहर, प्रेसिडेंट गणपत चौधरी, व्हाईस प्रेसिडेंट विजय भंडारी आणि जितोचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात १० हजार लोक उपस्थित होते.

या बिझनेस कॉनक्लेवमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून उद्योगपती, प्रतिष्ठित व्यवसायिक, उत्पादक आणि स्टार्टअप करणाऱ्या अनेक नवीन उद्योजकांना अमृता फडणवीस यांनी संबोधित केले. जैन समाज व्यवसायिक नेतृत्वाच्या क्षमतेने भरलेला समृद्ध समाज आहे.
जो आपल्या सोबतच इतर समाजाच्या विकासासाठीही प्रयत्न करत असल्याचे त्या म्हणाल्या. उद्घाटन समारोहनंतर अमृता फडणवीस यांनी ह्यजितो उडानह्णच्या अनेक प्रमुख स्टॉलवर जाऊन स्वत: उत्पादकांची कॉलिटी, व्यवसायिक विकास आणि उत्पादक वस्तू बाजारात गेल्यानंतर त्याच्या महत्त्वाची माहिती घेतली. यासोबतच वर्तमानात व्यवसायिकांची परिस्थिती आणि उत्पादक बाजारात टिकून राहण्यासाठी करत असलेले प्रयत्न, अशा अनेक विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.

‘जितो उडान’ जैन समाजाची विश्वस्तरीय संस्था जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन (जितो) चा पहिला उपक्रम आहे. जो मूळ रूपाने व्यवसायिक विकास आणि सामाजिक विकासाच्या कायार्ला समर्पित आहे. अमृता फडणवीस यांनी याप्रसंगी सातशे हून अधिक ट्रेड स्टार्ट, स्टार्टअप पवेलियन, रोजगाराच्या अनेक संधी आणि व्यवसायिक विकास संबंधित सेमिनार, कॉन्फरन्स सोबतच शेकडो अत्यंत दुर्लभ आणि धार्मिक महत्त्व असलेल्या जैन मूर्तींनी सजलेल्या पवेलियनचेही निरीक्षण केले.


Web Title: Business Development Essential for Social Development - Amrita Fadnavis
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.