बुलेट टर्मिनस; ५०० वाहनांसाठी वाहनतळ

By महेश चेमटे | Published: February 20, 2018 06:26 AM2018-02-20T06:26:48+5:302018-02-20T06:27:19+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात सध्या वाहनतळांची समस्या भेडसावत आहे. काही रेल्वे स्थानक वगळता बहुतांश स्थानकांवर वाहनतळ नाही.

Bullet terminus; Parking for 500 vehicles | बुलेट टर्मिनस; ५०० वाहनांसाठी वाहनतळ

बुलेट टर्मिनस; ५०० वाहनांसाठी वाहनतळ

Next

महेश चेमटे
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात सध्या वाहनतळांची समस्या भेडसावत आहे. काही रेल्वे स्थानक वगळता बहुतांश स्थानकांवर वाहनतळ नाही. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रस्तावित बुलेट ट्रेन टर्मिनस येथे ५०० वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील महाराष्ट्र टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) जवळ मुंबई बुलेट ट्रेन टर्मिनसची तीन मजली भुयारी इमारत उभी राहणार आहे.
या तीन मजली इमारतीपैकी पहिला मजला स्थानक प्रशासनासाठी असेल. यात स्टेशन व्यवस्थापकांसह टर्मिनसमध्ये विविध कामे करणाºया अधिकाºयांचे कार्यालय असेल. त्याचबरोबर विविध उपकरणे ठेवण्यासाठी याचा वापर होईल. दुसरा मजला प्रवाशांच्या सुविधा आणि मनोरंजनासाठी असेल. येथे प्रवाशांना बुलेट ट्रेनचे तिकीट खरेदी करता येईल. त्याचबरोबर या मजल्यावर प्रवाशांसाठी प्रतीक्षालय (वेटिंग रूम), फूडकोर्ट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, वाचनालय असे मनोरंजनपर स्टॉल असतील. तिसºया मजल्यावरून ट्रेन धावेल, अशी माहिती एनएचआरसीएलचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी दिली.
दरम्यान एमएमआरडीए मैदानातील ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट प्रकल्पाचे काम हाती घेतलेल्या नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनचाही (एनएचआरसीएल) स्टॉल आहे. या स्टॉलला सुमारे ५००हून अधिक गुंतवणूकदारांनी भेट दिली. यात बहुतांशी गुंतवणूकदारांनी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमध्ये सहभाग घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. यात भुयारी मार्ग बनवणे, स्थानकातील स्टॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स या विषयांवरील शंकांचे निरसन करून घेत बुलेट ट्रेन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याबाबत स्वारस्य दाखवले.


मासिक पास असेल का?
स्टॉलला भेट दिलेल्या नागरिकांनी दर आणि सर्वसामान्यांना याचा थेट फायदा काय होईल, याविषयी शंका विचारल्या. त्याचबरोबर ठाणे, विरार, बोईसर या टप्प्यातील दर जाहीर केले. उर्वरित टप्प्यातील दर किती असतील, अशा प्रश्नांची सरबत्ती केली. त्याचबरोबर रोज प्रवास करू इच्छिणाºया प्रवाशांना बुलेट ट्रेनसाठी मासिक पास ही सुविधा मिळेल का, असा प्रश्नही विचारला. मात्र ‘मासिक पासविषयी अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती एनएचआरसीएलचे धनंजय कुमार यांनी दिली.

असा असेल वाहनतळ
तीन मजली ‘मुंबई बुलेट ट्रेन’ भुयारी टर्मिनस
पहिला मजला - स्थानक प्रशासन
दुसरा मजला - तिकीट खिडकी
आणि प्रवासी सुविधा
तिसरा मजला- बुलेट ट्रेन फलाट
फलाटाची लांबी - ४१० मीटर

Web Title: Bullet terminus; Parking for 500 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.