भावाने दिले बहिणीला मूत्रपिंड, बहीण-भावाचे नाते जपणारी अनोखी भाऊबीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 06:53 AM2017-10-23T06:53:09+5:302017-10-23T06:53:15+5:30

मुंबई : तेजोमय प्रकाशाचा दिवाळी सण नुकताच साजरा झाला. त्यात बहीण-भावाचे नाते जपणारी भाऊबीजही नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. याच भाऊबिजेच्या सणात एका भावाने बहिणीला प्रत्यारोपणासाठी आपले मूत्रपिंड देत, वेगळा आदर्श घालून दिला आहे. या आगळ््या-वेगळ््या ओवाळणीच्या माध्यमातून बहिणीला आयुष्यभराची नवसंजीवनी मिळाली आहे.

The brother gave the kidney to the brother, the brother-in-law, the unique brother-in-law | भावाने दिले बहिणीला मूत्रपिंड, बहीण-भावाचे नाते जपणारी अनोखी भाऊबीज

भावाने दिले बहिणीला मूत्रपिंड, बहीण-भावाचे नाते जपणारी अनोखी भाऊबीज

Next

मुंबई : तेजोमय प्रकाशाचा दिवाळी सण नुकताच साजरा झाला. त्यात बहीण-भावाचे नाते जपणारी भाऊबीजही नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली. याच भाऊबिजेच्या सणात एका भावाने बहिणीला प्रत्यारोपणासाठी आपले मूत्रपिंड देत, वेगळा आदर्श घालून दिला आहे. या आगळ््या-वेगळ््या ओवाळणीच्या माध्यमातून बहिणीला आयुष्यभराची नवसंजीवनी मिळाली आहे.
३६ वर्षांच्या राहुलने आपली बहीण रमाला ओवाळणी म्हणून नवीन आयुष्यच दिले आहे. अवघ्या ३० वर्षांची रमा काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होती. लवकरात लवकर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादी मोठी असल्याने, तिच्या भावानेपुढाकार घेऊन आपल्या बहिणीला मूत्रपिंड दान करण्याचा निर्णय घेतला. परळ येथील खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया शुक्रवारी पार पडली.
रमाची प्रकृतीच सगळ्यात जास्त महत्त्वाची होती. प्रतीक्षायादी खूप मोठी असल्याने, मूत्रपिंड देण्याचा निर्णय घेतला. तो आमच्यासाठी फार भावनिक क्षण होता. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, हे पाहून खूप समाधानाची भावना असल्याचे राहुलने सांगितले.
>गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
एखाद्या पुरुषाने स्त्रीसाठी अवयवदान करण्याचे प्रमाण खूप कमी आहे, अशी माहिती डॉ. भरत शहा यांनी दिली.

Web Title: The brother gave the kidney to the brother, the brother-in-law, the unique brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.