बॉस ‘मिसाइल’ बोलला, म्हणून महिला एमडीची पोलिसांत धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 06:06 AM2018-05-16T06:06:15+5:302018-05-16T06:06:15+5:30

‘अरे तू तो मेरी मिसाइल है,’ अशी अश्लील कमेंट करून विनयभंग करणाऱ्या बॉसविरोधात एका बड्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका महिलेने पोलिसांत धाव घेतल्याची घटना लोअर परळमध्ये उघडकीस आली.

The boss said 'Missile', so the lady gets the MD of the police | बॉस ‘मिसाइल’ बोलला, म्हणून महिला एमडीची पोलिसांत धाव

बॉस ‘मिसाइल’ बोलला, म्हणून महिला एमडीची पोलिसांत धाव

Next

मुंबई : ‘अरे तू तो मेरी मिसाइल है,’ अशी अश्लील कमेंट करून विनयभंग करणाऱ्या बॉसविरोधात एका बड्या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका महिलेने पोलिसांत धाव घेतल्याची घटना लोअर परळमध्ये उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चेतन महाजन यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात राहात असलेली ४१ वर्षीय रेश्मा (नावात बदल) लोअर परळमधील एका बड्या खासगी कंपनीत व्यवस्थापकीय संचालिका होती. तिचे पती व्यावसायिक आहेत. तिने केलेल्या तक्रारीनुसार, ती काम करत असलेल्या कंपनीत जानेवारी २०१७ ते मार्च २०१८ या काळात महाजन सीईओ, तसेच आॅल इंडिया प्रेसिडेंट पदावर होता. दिल्लीतील मुख्यालयात बसत असलेला महाजन महिन्यातून दोनदा कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात येत असे.
त्याचे महिला कर्मचाºयांकडे वाईट नजरेने बघणे रेश्माला खटकत असे. सप्टेंबर महिन्यापासून महाजन आठवड्यात दोन दिवस कार्यालयातच थांबू लागला. त्याचे रेश्मा यांच्या केबिनमध्ये येणे वाढले. कारण काढून जवळ येऊन बसण्यासोबतच त्याचे अश्लील नजरेने पाहणे सुरू झाले. बॉस असल्यामुळे ती शांत बसायची.
अशातच, महाजन कामानिमित्त फोन करताना, ‘अरे तू तो मेरी मिसाइल है,’ असे बोलला. मिसाइल म्हणजे बॉम्ब, फटाका अशा अर्थाने
तो बोलल्याने याची चर्चा कार्यालयात होती. २५ आॅक्टोबर रोजी बंगळुरूचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात आले
होते. त्या वेळीही, त्याने रेश्माची ओळख ‘ये मिसाइल है...’ अशी करून दिली. कर्मचाºयांच्या सुट्टीबाबत बोर्डावर लिहिलेल्या यादीत रेश्माचा उल्लेख ‘मिसाइल’ म्हणूनच केल्याचे रेश्माचे म्हणणे आहे. पतीच्या सल्ल्यानुसार तिने २५ डिसेंबरला सिंगापूरमधील मुख्य संचालकांना मेलद्वारे तक्रार केली. त्यानंतरही परिस्थिती जैसे थेच असल्याने, पोलिसांत तक्रार दिली.
>नोकरी सोडणे हाच पर्याय... : रेश्माने आवाज उठविला म्हणून तिच्याकडील सर्व काम हळूहळू काढून घेण्यात आले. तिचे सर्व क्लायंट महाजनने काढून घेतले. तिने वरिष्ठांकडे तक्रार केली असता, कार्यालयातील परिस्थितीच्या विरोधात जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण सुरू झाले. कार्यालयातील अंतर्गत तक्रार कमिटीतील सदस्यांनीही ‘मिसाइल’ शब्द गैर नसल्याचे स्पष्ट करत, रेश्मालाच टार्गेट केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. यानंतर, कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशावरून सहकारी कर्मचाºयांनीही तिच्याशी संवाद तोडला. शेवटी नोकरी सोडणे हाच पर्याय उरल्याने १३ फेब्रुवारी रोजी तिने पदाचा राजीनामा दिला.

Web Title: The boss said 'Missile', so the lady gets the MD of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.