पालघरसह बोईसर, मनोर 100टक्के बंद

By admin | Published: November 11, 2014 11:07 PM2014-11-11T23:07:32+5:302014-11-11T23:07:32+5:30

मंगळवारी संपूर्ण पालघर जिल्हा बंदची हाक देत सर्वपक्षीय बहुजन समाज अन्याय अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

Boisers with Palghar, 100 percent off man | पालघरसह बोईसर, मनोर 100टक्के बंद

पालघरसह बोईसर, मनोर 100टक्के बंद

Next
पालघर : अहमदनगर जिल्हय़ातील जवखेड हत्याकांडाला वीस दिवसाचा अवधी उलटूनही आरोपींना पकडण्यात प्रशासनासह पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ मंगळवारी संपूर्ण पालघर जिल्हा बंदची हाक देत सर्वपक्षीय बहुजन समाज अन्याय अत्याचार संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी बांगर यांना निवेदन देण्यात आले.
पुरोगामी म्हणवणा:या महाराष्ट्रात काही महिन्यापासुन बौद्ध आदिवासी, मागासवर्गीय, बहुजनांवर जातीयतेच्या भावनेतून हल्ले होत असल्याचे खैरलांजी हत्याकांड, नितीन आगे प्रकरण, हिंगोली येथील हल्ले अशा उदाहरणांतून दिसून आलेले आहे. नुकतेच अहमदनगर जिल्हय़ातील जवखेड गावातील जाधव कुटुंबीयातील सदस्यांची क्रूरपणो हत्या करण्यात आली.  मानवतेला काळीमा फासणा:या या घटनेला 2क् दिवस उलटूनही राज्यशासन व पोलीस प्रशासन या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे राज्यशासनाच्या निषेधासह आरोपींना लवकरात लवकर अटक करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी सर्वपक्षीय बहुजन समाज अन्याय अत्याचार संघर्ष समितीने केलेल्या पालघर बंदला शहरात संपूर्ण प्रतिसाद मिळाला. 
मनोर, सफाळा, सातपाटी, तारापूर, वाणगांव येथून संमिo्र प्रतिसाद मिळाला. पालघर स्टेशनवरून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, मनिषा निमकर, बविआ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सेना जिल्हाप्रमुख उत्तम ¨पंपळे, आरपीआयचे जिल्हाप्रमुख सुरेश जाधव, राष्ट्रवादीचे दामोदर पाटील, विनोद मोरे यांच्या उपस्थितीत हजारो नागरीक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता. बंदच्या काळात फक्त बससेवा सुरू होती. रिक्षा तसेच दुकानेही बंद असल्याने अनेकांचे हाल झाले; तर काही कारखाने जबरदस्तीने बंद करण्याचा प्रय} पोलिसांनी हाणून पाडला. (वार्ताहर)
 
बोईसरलाही यशस्वी बंद
बोईसर :  पालघर जिल्हयातील सर्वपक्षीय बहुजन अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समितीने पुकारलेल्या बंद बोईसरला चांगलाच यशस्वी झाला. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, शाळा, कॉलेज, आर्थिक संस्था, एस.टी आणि तारापुर एम.आय.डी.सी मधील उद्योगा व्यतिरीक्त बोईसर शहरातील बोईसर व चित्रलय या दोन्ही महत्वाच्या आणि मोठय़ा बाजारपेठा बंद होत्या. नागरीकांना एसटीचा आधार घ्यावा लागला. मात्र या बंदमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते

 

Web Title: Boisers with Palghar, 100 percent off man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.