BMC's employees are waiting for the 2017 election winnings | मुंबई महापालिकेचे कर्मचारी २०१७च्या निवडणुकीच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत
मुंबई महापालिकेचे कर्मचारी २०१७च्या निवडणुकीच्या मोबदल्याच्या प्रतीक्षेत

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या कामानिमित्त महापालिकेचे ११ हजार कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. सहा महिन्यांनंतर विधानसभा निवडणुका असल्याने या कर्मचाऱ्यांना तिथेही कामे करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र २०१७च्या पालिका निवडणूक काळात दिवसरात्र काम करूनही ४३०० कर्मचाऱ्यांना अद्याप त्याचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. पालिकेच्या ४३०० कर्मचाºयांनी या काळात निवडणुकीचे काम केले होते. नेहमीच्या कार्यालयीन कामापासून निवडणुकीचे काम वेगळे व अतिरिक्त असल्याने नियमानुसार कर्मचाºयांना त्याचा मोबदला मिळणार होता. मात्र अद्याप या कर्मचाºयांना त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्बल साडेसहा कोटी रुपये आहे. वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाने अद्याप हे मानधन दिलेले नाही, अशी तक्रार कर्मचारी करीत आहेत.

निवडणुकीचे काम जबाबदारीचे व जोखमीचे असते, या कामात कोणतीही कसूर राहू नये यासाठी डोळ्यांत तेल टाकून काम करावे लागते. कार्यालयाचे काम संपवून निवडणुकीचे काम उरकेपर्यंत कधी कधी रात्रही होते. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पुन्हा पालिकेच्या ११ हजार कर्मचाºयांची निवड झाली आहे. विधानसभा निवडणुकीतही यापैकी अनेकांना जावे लागेल. मात्र या कामाचा मोबदला मिळत नसल्यास काम करायला प्रोत्साहन मिळत नाही, अशी नाराजी कर्मचारी व्यक्त करीत आहेत.

४३०० कर्मचाºयांत नाराजी
महापालिका निवडणूक २०१७ मध्ये ४३०० कर्मचाºयांनी काम केले होते. त्यांना देय असलेले साडेसहा कोटी रुपये गेल्या दोन वर्षांत मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पालिकेचे ११ हजार कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकाही सहा महिन्यांत असल्याने या कर्मचाºयांना ते कामदेखील करावे लागण्याची शक्यता आहे.


Web Title: BMC's employees are waiting for the 2017 election winnings
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.