मुंबई महापालिकेचा 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसातहीसाठी 10 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 02:32 PM2019-02-04T14:32:59+5:302019-02-04T15:22:15+5:30

मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाचा 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मेहता यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला.

BMC Presented Its Budget For Year 2019-20 | मुंबई महापालिकेचा 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसातहीसाठी 10 कोटी

मुंबई महापालिकेचा 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसातहीसाठी 10 कोटी

Next
ठळक मुद्देआयुक्तांनी नाराजी व्यक्त करीत केवळ प्रवाशांसाठीच्या योजनांसाठी 34.10 कोटीची तरतूद केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी.- सातवा वेतन आयाेगाच्या अंमलबजावणीसाठी अनावश्यक खर्चावर कपात करणार

मुंबई - मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी 2019-20 या आर्थिक वर्षाचा 30 हजार 692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मेहता यांनी सोमवारी (4 फेब्रुवारी) स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना अर्थसंकल्प सादर केला.

मालाड , महालक्ष्मी आणि देवनार येथे पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनीची सुविधा उपलब्ध होणार त्याकरिता ११.५० कोटींची तरतुद

पशु वैद्यकीय आरोग्य खात्याकरिता गेल्यावर्षी १३.३० कोटींचा निधी , यंदा ३५.६० कोटींची तरतुद

वाहन तळ प्राधिकरणासाठी तीन काेटी तरतूद... मुंबईतील वाहनांचे नियमन व व्यवस्थापनासाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती. 

नऊ प्रसूतिगृहात मध्यवर्ती मेडिकल गॅस प्रणाली पुरविण्यासाठी १.७५ इतकी तरतुद
पुलांच्या दुरूस्तीसाठी 108 कोटी...14 पूल पाडून पुनर्बांधणी, 47 पूल मोठी दुरूस्ती, 176 किरकोळ दुरूस्ती

गोवंडी येथील नॅशनल प्लाझ्मा फ्रॅक्सिनेशन सेंटरच्या पुनरुत्थानासाठी २५ लाखांची तरतूद

महापालिका आता विविध सेवा आकार आणि प्रवेश शुल्क लावण्याचा विचार करीत आहे

भटक्या मांजरीचे निर्बीजिकरण करण्यासाठी १ कोटींची तरतुद
विकास नियोजन आराखडा तरतुदीनुसार क्रिडांगणे, उद्याने, दवाखाने रूग्णालये, स्मशानभूमी, अग्निशमन दल, मंडई, रस्ते, साठी 3323.64 कोटी
कोस्टल रोड - 1600.07 कोटी
गोरेगाव मुलुंड जोड रस्ता 100 काेटी
मुंबईतील 370 कि.मी.रस्त्यांची सुधारणा
यासाठी 1520.09 कोटींची तरतूद

मालाड , महालक्ष्मी आणि देवनार येथे पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनीची सुविधा उपलब्ध होणार त्याकरिता ११.५० कोटींची तरतुद
पशु वैद्यकीय आरोग्य खात्याकरिता गेल्यावर्षी १३.३० कोटींचा निधी , यंदा ३५.६० कोटींची तरतुद

आयुक्तांना नाराजी व्यक्त करीत केवळ प्रवाशांसाठीच्या योजनांसाठी 34.10 कोटीची तरतूद केली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या निवासी वसाहतीच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी.
 

- सातवा वेतन आयाेगाच्या अंमलबजावणीसाठी अनावश्यक खर्चावर कपात करणार

-कर्मचा-यांच्या कामाच्या तासांच्या व्यवस्थापनासाठी सुधारणा

- काेस्टल राेड, गाेरेगाव मुलुंड जाेड रस्ता, मलनिस्सारण प्रकल्प, पुलांची दुरूस्ती, रस्त्यांची सुधारणा यासाठी माेठी तरतूद

- गोरेगाव- मुलुंड जोडरस्त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद

- कोस्टल रोडसाठी 1600 कोटींची तरतूद

- बेस्टमधील सुधारणांसाठी 34.10 कोटींची तरतूद

- मुंबईतील रस्तेदुरुस्तीसाठी 1 हजार 520 कोटींची तरतूद

 बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी 10 कोटींची तरतूद

रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली साठी २०१८-१९ वर्षात ६८.४२ कोटी रुपयांची सुधारित तरतूद
- आर्थिक वर्ष २०१९-२० साठी २०६. २५ कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद प्रस्तावित आहे.

भगवती रुग्णालय ५९२ कोटी रुपये
एम ती अग्रवाल रुग्णालय ४९८ कोटी रुपये
कूपर रुग्णालय २९० कोटी रुपये
शताब्दी रुग्णालय ५०२ कोटी रुपये
लेप्रसि रुग्णालय १५५ कोटी रुपये
नायर रुग्णालय २५० कोटी रुपये
भाभा रुग्णालय २९७ कोटी रुपये
सायन रुग्णालय ६५० कोटी रुपये
नायर दंत महाविद्यालय १५१ कोटी रुपये
टाटा रुग्णालय हॉस्टेल इमारत ५५ कोटी रुपये



 

- रुग्णांच्या सेवेसाठी विविध प्रकारची अत्याधुनिक साधन सामग्रीच्या उपलब्धतेसाठी 100 कोटी रुपयांची 26 वैदयकीय उपकरणे घेतली असून त्याबाबत कार्यवाही सुरू आहे 
- दवाखाने आणि उपनगरीय रुग्णालये यांचा दर्जा सुधारण्यासाठी 242.59 कोटी रुपयांची तरतूद 
- उपनगरीय रुग्णालयातील साफसफाई सेवेच्या बाह्य स्रोतीकरणासाठी अर्थसंकल्पात 25.55 कोटी रुपयांची तरतूद
- 'आपली चिकित्सा' प्रकल्पासाठी 16.38 कोटी रुपयांची तरतूद
- होतकरू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी  Business Incubation Center सुरू करण्यात येत आहे
- यासाठी सोसायटी फॉर मुंबई इनक्युबेशन लॅब टू इन्टप्य्रुनशिप या स्पेशल पर्पज व्हेईकलच्या निर्मिताला मंजुरी
-सर्व प्रमुख रुग्णालयांसाठी 230.51 कोटी रुपयांची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. यात यंत्र आणि सयंत्र यासाठी 155 कोटी रुपये आणि पायाभूत सुविधा कामांसाठी 75 कोटी रुपयांची तरतूद
-2018-19 मध्ये आरोग्य सेवेसाठी 3601.86 कोटी रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. यंदा नवीन रुग्णालयाची उभारणी आणि उपकरणांचा दर्जा सुधारण्यासाठी 4 हजार 151 कोटी रुपयांची तरतूद,  गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के वाढ
- सायन कोळीवाडा महानगरपालिका कर्मचारी निवासस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी 50 लाख रुपयांची तरतूद

Web Title: BMC Presented Its Budget For Year 2019-20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.